अभिनया व्यतिरिक्त सचिन श्रॉफ बिझनेसमधूनही कमावत...
अभिनया व्यतिरिक्त सचिन श्रॉफ बिझनेसमधूनही कमावतो तगडे पैसे, जाणून घ्या अभिनेत्याची एकूण संपत्ती (Apart from Acting, Sachin Shroff also Earns a Lot From Business, Know Net Worth of TV’s Tarak Mehta)

अनेक मालिका आणि वेब सिरीजमध्ये दिसलेला अभिनेता सचिन श्रॉफ वयाच्या ५० व्या वर्षी पुन्हा एकदा बोहल्यावर चढणार आहे. अभिनेत्याच्या मते,त्याला आपले कुटुंब प्रसिद्धीपासून दूर ठेवायचे आहे त्यामुळे लग्नाबद्दल तो फारसा खुलासा करणार नाही. मात्र, रिपोर्ट्सनुसार, सचिन श्रॉफ आज संध्याकाळी मुंबईतील एका हॉटेलमध्ये लग्न करुन आपल्या वैवाहिक आयुष्याला सुरुवात करणार आहे. सध्या, सचिन ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये तारक मेहताची भूमिका साकारत आहे, परंतु तो अभिनयासोबतच व्यवसायातूनही भरपूर कमाई करतो, चला तर मग जाणून घेऊया या अभिनेत्याची एकूण संपत्ती किती आहे.
सचिन श्रॉफची टीव्ही कारकीर्द अतुलनीय आहे, पण तो एक यशस्वी उद्योगपतीही आहे. रिपोर्ट्सनुसार, सचिन रिअल इस्टेट व्यवसायाशी संबंधित आहे. सचिन टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये तारकचे पात्र साकारण्यासाठी 25 ते 30 हजार रुपये फी आकारतो, तर त्याची एकूण संपत्ती 23 दशलक्ष असल्याचे सांगितले जाते.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये शैलेश लोढा यांची जागा सचिन श्रॉफने घेतली आहे. त्यांच्या आधी तारक मेहताची भूमिका शैलेश लोढा यांनी सुमारे 14 वर्षे या शोमध्ये साकारली होती. वर्षानुवर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर त्यांनी या शोला निरोप दिला, त्यानंतर सचिन श्रॉफने नवीन तारक मेहता म्हणून शोमध्ये प्रवेश केला.
अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर त्याने २००९ मध्ये टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री जुही परमारसोबत लग्न केले. या जोडप्याला समायरा नावाची मुलगी आहे. सचिन आणि जुहीचे लग्न जवळपास 6 वर्षे टिकले, त्यानंतर 2015 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. पहिल्या पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर सुमारे 8 वर्षांनी सचिन पुन्हा लग्न करून सेटल होणार आहे. सचिनची भावी पत्नी इव्हेंट मॅनेजर आणि इंटिरियर डिझायनर आहे.
अभिनेत्याच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास सचिन लोकप्रिय वेब सिरीज ‘आश्रम’ मध्ये दिसला होता. ही सिरीज खूप लोकप्रिय झाली असून यावर्षी या सिरीजचा चौथा सीझन येणार आहे. याशिवाय ‘गुम है किसी के प्यार में’मध्येही तो राजीवची भूमिका साकारताना दिसला आहे. मात्र, काही महिन्यांनंतर त्याने या शोपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.
सचिन श्रॉफने 2005 साली ‘सिंदूर तेरे नाम का’ या मालिकेतून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर त्याने ‘हर घर कुछ कहते है’, ‘नागिन’, ‘सात फेरे’ आणि ‘शगुन’ सारख्या मालिकांमध्ये काम केले. तो मोठ्या पडद्यावरही दिसला आहे. ‘दसवी’ आणि ‘डबल एक्सएल’ सारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे.