अनुष्का शर्माचा मिरर सेल्फी व्हायरल ; कमालीचा स...

अनुष्का शर्माचा मिरर सेल्फी व्हायरल ; कमालीचा सुडौलपणा पाहून चाहते अचंबित! (Anushka Sharma’s Stunning Mirror Selfie goes viral with Burp cloth)

बाळंतपणानंतर मीडियापासून स्वतःला दूर ठेवलेल्या अनुष्का शर्माने अलीकडेच स्वतःचा एक मिरर सेल्फी शेअर केला आहे. तिचा हा फोटो पाहिल्यानंतर महिन्याभरापूर्वी तिने एका मुलीला जन्म दिला आहे, यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. अनुष्काने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर जो मिरर सेल्फी पोस्ट केला आहे, त्यात ती इतकी फिट आणि परफेक्ट फिगर असलेली दिसतेय की तिला पाहून चाहत्यांना अचंबित व्हायला झाले आहे. या फोटोमध्ये तिने लहान मुलांसाठी वापरण्यात येणारे बर्प क्लॉथ खांद्यावर ठेवले आहे आणि फोटो कॅप्शनमध्ये असं लिहिलंय, ”सध्याची माझी फेव्हरेट अक्सेसरीज बर्प क्लॉथ.”

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

या फोटोंमध्ये अनुष्का इतकी सुडौल आणि सुंदर दिसतेय की तिचे फोटो पाहिल्यानंर तिच्या चाहत्यांना ती कधी गरोदर होती की नाही? असा प्रश्न पडला आहे. ११ जानेवारीला अनुष्काने एका सुंदर मुलीला जन्म दिला. नुकतेच वामिका असं मुलीचं नामकरणही झालं आहे. बाळंतपणानंतर काही दिवसांनी विराट आणि स्वतःसोबत वामिकाचा फोटोही तिने शेअर केला होता.

फोटो सौजन्य:इंस्टाग्राम

विरुष्काने वामिकासोबतचा फोटो शेअर करून आपल्या चाहत्यांचे शुभेच्छांसाठी आभार मानले आहेत. वामिकाच्या जन्मामुळे आपल्याला झालेला आनंद हा इतर कोणत्याही आनंदापेक्षा मोठा असल्याचंही विराटने यावेळी म्हटलं आहे. वामिकाचा जन्म हा त्यांच्या जीवनातील सोनेरी क्षणांइतकाच मौल्यवान क्षण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. काही काळाकरीता मीडीया आणि सोशल प्लॅटफॉर्मपासून दूर राहिलेली अनुष्का आता पु्न्हा आपल्या सोशल अकाऊंटवर सक्रीय झाली आहे. तेव्हा यापुढे तिच्या आणखीही सुंदर पोस्ट चाहत्यांना पाहायला मिळतील. सध्या तरी चाहत्यांकडून तिच्या फिटनेसचे फारच कौतुक केले जात आहे.