विराट कोहलीच्या वाढदिवशी, अनुष्का शर्माने विनोद...

विराट कोहलीच्या वाढदिवशी, अनुष्का शर्माने विनोदी पद्धतीने दिल्या शुभेच्छा! (Anushka Sharma wishes hubby Virat Kohli on birthday with funny and goofy pics, Writes- Love you in every state and form)

ऑस्ट्रेलियात चालू असलेल्या टी२० वर्ल्ड कप स्पर्धेत सध्या विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपते आहे. आज विराटचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने जगभरातील लोक त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माने अगदी खास विनोदी पद्धतीने त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या या पोस्टवर चाहते बेहद्द खुश झाले आहेत.

सोशल मीडियावर सदैव एकमेकांवर मोकळेपणाने प्रेम व्यक्त करणारे विराट-अनुष्का हे जोडपे आहे. अनुष्काने आपल्या नवऱ्याला, त्याच्या ३४ व्या वाढदिवसानिमित्त खूपच प्रेमाने ओथंबलेल्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोबत त्याचे कधीही न पाहिलेले फोटो प्रसिद्ध केले आहेत. या फोटोत तो खूपच विनोदी दिसतो आहे. शिवाय विराट सोबत तिने आपली मुलगी वामिकाचा पण फोटो प्रसिद्ध केला आहे.

या फोटोंसोबत अनुष्काने लिहिलं आहे की, ‘तुमच्या वाढदिवसानिमित्त मी तुमचे अगदी वेगळे फोटो निवडले आहेत… प्रत्येक रुपात, आविर्भावात माझे तुम्हाला प्रेम…’ सोबत तिने हार्ट इमोजी पण शेअर केले आहेत.

अनुष्काच्या या प्रेमभऱ्या पोस्टवर विराटने प्रेम व्यक्त केले आहे. अन्‌ हार्ट इमोजी प्रसारित केले आहेत. अनुष्काच्या या पोस्टवर बॉलिवूडचे काही कलाकार व क्रिकेटवीरांनी देखील मजेदार प्रतिक्रिया व्यक्त करून विराटला शुभेच्छा दिल्या आहेत.

(फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)