विराट आणि अनुष्काची लाडकी लेक वामिका झाली 2 वर्...

विराट आणि अनुष्काची लाडकी लेक वामिका झाली 2 वर्षांची, अभिनेत्री शेअर केला गोड फोटो (Anushka Sharma-Virat Kohli’s Daughter Vamika Turns Two, Actress Shares Cute Photo On Birthday)

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली, यांची मुलगी वामिका कोहली आज 2 वर्षांची झाली आहे. मुलीच्या वाढदिवसानिमित्त अनुष्का शर्माने सोशल मीडियावर एक अतिशय क्यूट फोटो शेअर केला आहे. या क्युट फोटोसोबत अभिनेत्रीने खूप गोड आणि छोटे कॅप्शनही लिहिले आहे.

मुलगी वामिकाच्या दुसर्‍या वाढदिवसाच्या निमित्ताने, अभिनेत्रीने आपल्या इन्स्टाग्रामवर वाढदिवसाची पोस्ट शेअर करुन आपल्या चाहत्यांना एक अद्भुत ट्रीट दिली. या लेटेस्ट फोटोमध्ये आई-मुलीची जोडी एकत्र दिसत आहे.

या कॅन्डिड फोटोमध्ये अनुष्का शर्मा आणि तिची मुलगी बाहेर फिरायला गेल्याचे पाहायला मिळते. अनुष्का पार्कच्या बेंचवर वामिकाला मांडीवर घेऊन बसली आहे. वामिका हसतच आपल्या आईच्या चेहऱ्यावर चुंबन घेत आहे, या फोटोत दोघांचेही चेहरे स्पष्ट दिसत नाहीत.

वामिका कोहलीच्या वाढदिवसाची पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर करत अनुष्काने एक गोड आणि लहान कॅप्शनही लिहिले अनुष्का शर्माच्या या फोटोवर प्रतिक्रिया देताना, तिचा भाऊ आणि निर्माता कर्णेश शर्मा याने कमेंट बॉक्समध्ये एव्हिल आय आणि रेड हार्ट इमोजी शेअर केले आहेत.

अभिनेत्रीचे मित्रमंडळी आणि चाहते या क्यूट फोटोला प्रचंड लाईक आणि कमेंट करत आहेत. अनेक चाहत्यांनी वामिकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत, तर काहींनी ‘क्यूटी’ लिहून आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.