अनुष्का-विराटच्या १० महिन्यांच्या मुलीला बलात्क...
अनुष्का-विराटच्या १० महिन्यांच्या मुलीला बलात्काराची धमकी… लोकांच्या वाह्यातपणाला अनुष्काचे सडेतोड उत्तर (Anushka Sharma-Virat Kohli’s 10-Month-Old Daughter Vamika Receives Rape Threats, Actress Shares Cryptic Post, Deets Inside)

टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताला पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला होता आणि त्यानंतर मोहम्मद शमीला काही लोकांनी टार्गेट केले होते. हे प्रकरण इतके वाढले की, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला शमीच्या समर्थनार्थ बाहेर पडावे लागले. एवढेच नाही तर सचिन तेंडुलकरपासून सर्व मोठ्या खेळाडूंनी देखील शमीचे समर्थन केले.
कोहलीने, धर्माच्या आधारे असा भेदभाव करणे चुकीचे असल्याचे म्हटले होते. त्यानंतर विराटच नाही तर अनुष्कालाही ट्रोलचा सामना करावा लागत आहे. या दरम्यान एक ट्विटही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अनुष्का-विराटची छोटी मुलगी वामिकाबद्दल एक अतिशय वाईट आणि घाणेरडी बाब लिहिली गेली होती.

लोकांनी विराट आणि अनुष्कासह वामिकालाही लक्ष्य केले असून १० महिन्यांच्या या चिमुरडीवर बलात्कार करण्याची धमकी दिली आहे. या ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, वामिकाची छायाचित्रे समोर येण्याची वाट पाहत आहोत… जेणेकरून…
मात्र, हे अकाऊंट डिलीट करण्यात आले असून, हे ट्विट कोणी केले हे कळू शकलेले नाही. त्याचा स्क्रीन शॉट ट्विट करून लोक त्यावर प्रतिक्रिया देत आहेत आणि असे ट्वीट करणाऱ्या लोकांच्या मानसिकतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

विराट एका मुस्लिमाला सपोर्ट करत आहे, याचा राग काढण्यासाठी हे लोक वामिकासाठी अशा गोष्टी लिहित असल्याचे म्हटले जात आहे.


यावर प्रतिक्रिया देताना चाहते म्हणताहेत की, या देशात अशी निर्बुद्ध माणसं आजही आहेत, हे जाणून वाईट वाटते. खरं तर हे आपल्या देशातील माणसाचं कृत्य नसणार तर इतर देशातील कोणा व्यक्तीने येथील लोकांच्या मनात द्वेष निर्माण करण्यासाठीच हे ट्वीट केलं असावं, असं म्हटलं जात आहे.
अशा गोष्टी घडण्याची ही पहिलीच बाब नाही, तर याआधीही धोनीच्या कर्णधारपदाखाली पराभव झाला, तेव्हाही त्याच्या मुलीला अशा धमक्या देण्यात आल्या होत्या.

या घटनेच्या काही तासांनंतर, अनुष्काने आता तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक पोस्ट टाकली आहे, ज्यामध्ये एक कोट आहे आणि त्यात लिहिले आहे – ‘प्रशिक्षक… खचलेल्या माणसाला सुधारण्यापेक्षा मजबूत मुले बनवणे सोपे आहे.’ लोकांच्या वाह्यातपणाला सडेतोड उत्तर देण्यासाठी अनुष्काने ही पोस्ट शेअर केली आहे.