कपाळी चंदनाचा टीळा, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा ...

कपाळी चंदनाचा टीळा, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा अशा धार्मिक लूकमध्ये विराट कोहलीने अनुष्का शर्मासोबत घेतले महाकाल मंदिरात दर्शन(Anushka Sharma, Virat Kohli Visit Mahakaleshwar Temple In Ujjain, Seek blessings of Baba)

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली या वर्षाच्या सुरुवातीपासूनच आध्यात्मिक प्रवास करत असून आतापर्यंत त्यांनी अनेक तीर्थक्षेत्रांवर भेटी दिल्या आहेत. आता दोघेही उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात आशीर्वाद घेण्यासाठी गेले आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेदरम्यान, विराट पत्नी अनुष्का शर्मासह शनिवारी पहाटे महाकाल मंदिरात पोहोचला, तिथे दोघांनी पहाटे ४ वाजता भस्म आरतीमध्ये भाग घेऊन भगवान महाकालचे आशीर्वाद घेतले. दोघांनीही भस्म आरतीमध्ये भाग घेत गाभाऱ्यात पूजाही केली. यादरम्यानचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

विराट आणि अनुष्का दोघांनी मंदिराच्या नंदी चौतऱ्यावर सुमारे दीड तास बसून भस्म आरतीला हजेरी लावली. आरतीनंतर दोघांनीही मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन पंचामृत पूजन अभिषेक केला. अनुष्का-विराटचा महाकाल मंदिरातील एक व्हिडिओही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोघे शिवलिंगाची पूजा करताना दिसत आहेत.

विराट आणि अनुष्का पूर्णपणे भक्तीमध्ये मग्न झाले होते. कपाळावर चंदनाचा त्रिपुंड, गळ्यात रुद्राक्ष, धोतर सोहळे परिधान करून विराट कोहली महाकालाचे ध्यान करताना दिसला, तर अनुष्का शर्माही गुलाबी रंगाच्या साडीत दिसली. तीही महाकालच्या भक्तीत तल्लीन झाली होती.

दर्शनानंतर विराटने मीडियाला ‘जय महाकाल’ म्हटले, त्यानंतर अनुष्का म्हणाली की, महाकाल मंदिरात येऊन भगवान महाकालचे आशीर्वाद घेणे खूप प्रसन्नादायी आहे. इंदौरमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या कसोटी सामना शुक्रवारी संपल्यानंतर विराटने शनिवारी पत्नी अनुष्कासोबत महाकाल मंदिरात दर्शन घेतले. त्याआधी केएल राहुलने पत्नी अथिया शेट्टीसोबत आणि अक्षर पटेल पत्नी मेहासोबत महाकालच्या भस्मार्तीला उपस्थिती लावली होती.  

नवीन वर्षाच्या सुरुवातीला विराट कोहली आणि अनुष्का शर्मा बाबा नीम करौली यांच्या आश्रमात पोहोचले होते. वृंदावनात दोन दिवस राहिले. यानंतर ते आनंदमाई आश्रमात पोहोचले, तेथे त्यांनी संतांची भेट घेतली.