अनुष्का शर्मा – विराट कोहली यांचे फुरसतीच...

अनुष्का शर्मा – विराट कोहली यांचे फुरसतीचे क्षण : चाहत्यांना भारीच आवडले (Anushka Sharma – Virat Kohli In Holiday Mood : Fans Compliment Them)

विराट कोहलीचं अनुष्का शर्मावर किती प्रेम आहे हे आपण जाणतोच. फुरसतीचे क्षण मिळताच विराट अतिशय रोमँटिक अंदाजाने बायकोवरील स्वतःचे प्रेम व्यक्त करताना दिसतो. आजही त्यानं असंच केलंय.

विराटने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अनुष्कासोबतचा एक फोटो शेअर केला आहे, या फोटोमध्ये त्याच्यासोबत पत्नी अनुष्का शर्मा नदीकिनारी बसलेली दिसत आहे. संथपणे वाहणारी नदी, हिरवेगार पर्वत आणि मोकळं आकाश अशा रम्य वातावरणाचा आनंद घेत दोघंही पाठमोरे बसले आहेत. दुरूनच फोटो क्लिक करण्यात आला आहे, असे फोटोवरून लक्षात येते.

विराट कोहलीने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, ”जेव्हा तू माझ्यासोबत असतेस तेव्हा मला कुठेही घरी असल्यासारखे वाटते.” विराटच्या या फोटोला खूप पसंती मिळत आहे. एका तासात २० लाखांहून अधिक युजर्सनी या फोटोला लाइक केले आहे.

तर विराटच्या या कॅप्शनवर अनुष्का शर्माने देखील मजेशीर उत्तर दिले आहे. “ही चांगली गोष्ट आहे, कारण तू क्वचितच घरी असतोस”, असे अनुष्काने आपल्या उत्तरात म्हटले आहे. अनुष्काच्या या उत्तरालाही जवळपास १७ हजार लाइक्स आहेत.

Virat Kohli

विराट आणि अनुष्का दोघंही त्यांचे फोटोज्‌ आणि व्हिडिओज्‌ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. त्यांचे हे फोटो पाहून चाहते वेडे होतात आणि भरभरून प्रतिक्रिया देतात.

विराटच्या या फोटोवर त्यांचे चाहते मजेशीर कमेंट्स करत आहेत. कुणी म्हटलं की, हो भाऊ बरोबर आहे… तुम्ही दोघं जगातलं बेस्ट कपल आहात… तर कुणी म्हटलंय हो, तुम्ही हे काम करत राहा, आम्ही शतक मारून येतो. चाहत्यांमधील एका महिलेने असंही म्हटलं की, मी तुझ्यावर प्रेम करते आणि मी अनुष्कापेक्षाही सुंदर आहे, कृपया एकदा तरी भेट. अनेकांनी त्याला हॉट म्हटलं, काहींनी लव्हेबल म्हटलंय.. प्रत्येकाने विरुष्काच्या या फोटोवर आपापल्या शैलीने प्रेम व्यक्त केलंय.

सध्या विराट सुट्टीचा आनंद घेत आहे आणि भारतीय संघ न्युझीलंडला टक्कर देत जबरदस्त मॅच खेळत आहे. लवकरच तो मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळताना दिसणार आहे.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम