विरुष्काची लाडकी लेक ‘वामिका’ झाली सहा महिन्यां...

विरुष्काची लाडकी लेक ‘वामिका’ झाली सहा महिन्यांची; अनुष्का शर्माने शेअर केले सेलिब्रेशनचे क्यूट फोटो (Anushka Sharma-Virat Kohli Celebrate Vamika’s Half Birthday, Anushka shares these cute clicks)

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान विराट कोहली यांची मुलगी वामिका सहा महिन्यांची झालीय. अनुष्का शर्माने मुलीच्या सहा महिन्यांच्या वाढदिवसानिमित्त वामिकसोबतचे काही क्यूट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

काल ११ जुलैला अनुष्का शर्मा – विराट कोहली यांची लेक वामिकाला सहा महिने पूर्ण झाले. हा आनंदाचा क्षण उभयतांनी वामिकासोबत एका पार्कमध्ये खास अंदाजात साजरा केला. अनुष्काने या सेलिब्रेशनचे काही गोड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्यांनी वामिकाचा चेहरा दाखवलेला नसला तरी हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

अनुष्का शर्माने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत अनुष्का पार्कमध्ये एका मॅटवर झोपलेली दिसत असून वामिका तिच्या पोटावर आहे. यात अनुष्का वामिकाला काहीतरी दाखवत असल्याचं लक्षात येतंय.

तर अनुष्काने विराट आणि वामिकाचा देखील एक गोड फोटो शेअर केलाय. यात विराट लाडक्या लेकीसोबत खेळताना दिसतोय. या फोटोमध्ये विराट आणि वामिकामधील बॉन्डींग चाहते खूप पसंत करत आहेत.

तिसऱ्या फोटोमध्ये उभयतांचे एक-एक पाय आणि वामिकाचे दोन्ही पाय दिसत आहेत.

चौथ्या फोटोमध्ये फुलांनी सजवलेला केक दिसत आहे. हा केक कापून वामिकाचा ६ महिने पूर्ण झाल्याचा आनंद विरुष्काने साजरा केला.

हे फोटो शेअर करत अनुष्काने एक खास पोस्ट लिहिली आहे. “तिचं हास्य आमचं संपूर्ण जग बदलू शकतं. आम्हाला आशा आहे की तुम्ही जसं पाहता त्याप्रमाणेच आम्ही ते प्रेम देऊ शकू.” असं म्हणत अनुष्काने मुलीला शुभेच्छा दिल्या आहेत.

अनुष्काच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनी कमेंट करत वामिकाला शुभेच्छा दिल्या आहेत.

११ जानेवरी २०२१ साली विराट आणि अनुष्काच्या संसारात वामिकाने तिच्या चिमुकल्या पावलांनी एण्ट्री केली होती. विराट आणि अनुष्काने अद्याप त्यांच्या मुलीला मीडियासमोर आणलेलं नाही.

भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान विराट कोहली आपल्या बायको व मुलीसोबत सध्या इंग्लंडमध्ये आहे. ४ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या टेस्ट सिरिज दरम्यानचा वेळ आपल्या कुटुंबासोबत घालविण्याकरिता त्याने मोठ्ठा ब्रेक घेतला आहे. कुटुंबासोबतच्या आनंदी क्षणाचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम अनुष्का शर्मा)