अनुष्का शर्माने शेअर केले मुलगी वमिकासोबतचे पार...

अनुष्का शर्माने शेअर केले मुलगी वमिकासोबतचे पार्कमधले फोटो(Anushka Sharma takes daughter Vamika to park, shares pic of her ‘great day’)

अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या आपल्या आगामी चकदा एक्सप्रेस या चित्रपटाच्या शूटिंगसाठी यूकेमध्ये व्यस्त आहे. नुकतेच तिने आपले बाहेर फिरताने फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ते फोटो पाहून ती आपल्या मुलीसह फिरायला गेल्याचे दिसते.

अनुष्का शर्मा सध्या यूकेमध्ये आगामी ‘चकदा एक्सप्रेस’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. जेव्हा जेव्हा अभिनेत्रीला तिच्या व्यस्त कामातून वेळ मिळतो तेव्हा ती इंस्टाग्रामवर आपल्या यूकेच्या सहलीचे फोटो शेअर करत असते.

अलीकडेच अनुष्काने आपल्या व्यस्त कामातून वेळ काढून मुलगी वामिका कोहलीला पार्कमध्ये फिरायला नेले. आऊटडोअर शूटिंगदरम्यान अनुष्काची मुलगी वामिकाही तिच्यासोबत असते. जेव्हा अनुष्काला कामातून वेळ मिळतो तेव्हा ती आपला मोकळा वेळ मुलगी वामिकासोबत घालवते.

अनुष्का शर्माने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या नवीन फोटोमध्ये, अभिनेत्री पार्कमध्ये हसताना दिसत आहे. अनुष्काने आपल्या इंस्टाग्रामवर मजेशीर क्षणांचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत अनुष्काने कॅप्शन लिहिले- ‘प्ले पार्कमध्ये माझा दिवस चांगला गेला. कारण मी माझ्या मुलीसोबत तिथे गेली होती.

या फोटोत अनुष्कासोबत वामिका दिसली नसली तरी अनुष्काच्या गोड हास्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत. शेअर केलेल्या फोटोमध्ये अनुष्काने व्हाईट टी-शर्ट, ब्लू डेनिम आणि ग्रे जॅकेटसह व्हाइट स्नीकर्स घातलेले दिसत आहे.

हे फोटो पाहून अनेक चाहत्यांनी अनुष्काला वामिका कुठे आहे असा प्रश्न विचारला, तर कुणी अनुष्काच्या नो मेकअप लूकचे कौतुक केले. एकाने लिहिले – नैसर्गिक सौंदर्य आणि दुसरा म्हणाला कोणी इतके सुंदर कसे असू शकते. एकाने कमेंटमध्ये म्हटले की, अनुष्का पार्कमध्ये वामिकापेक्षा जास्त एन्जॉय करत होती. अनुष्काच्या या फोटोवर अनेक चाहत्यांनी हार्ट इमोजी शेअर केले आहेत.