विराटच्या ७१ व्या शतकानंतर अनुष्काची भावूक पोस्...

विराटच्या ७१ व्या शतकानंतर अनुष्काची भावूक पोस्ट, म्हणाली “मी नेहमीच तुझी साथ देईन, कधीही आणि कोणत्याही परिस्थितीत” (Anushka Sharma pens heartfelt note for Virat Kohli after 71st Century, says- Forever with you through any and everything)

विराट कोहलीने आशिया चषक (Asia Cup 2022) स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्ध नाबाद खेळी करताना शतक झळकावलं. त्याने ३३ महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हे ७१ वं शतक ठोकलं आहे. विशेष म्हणजे विराट कोहलीनं शतक झळकावताच प्रथम आनंदानं अंगठीचं चुंबन घेतलं आणि शतकी खेळीबद्दल बोलताना अनुष्का शर्मानं कठीण प्रसंगात आपली साथ दिल्याचं सांगितलं. हे शतक त्यानं अनुष्का आणि मुलगी वामिका यांना समर्पित केलं आहे. यानंतर पत्नी अनुष्कानेही भावूक पोस्ट शेअर करत विराटवरील प्रेम व्यक्त केलं आहे.

अनुष्काने तिच्या इंस्टाग्रामवर विराट कोहलीचे काही फोटोही शेअर केले आहेत आणि त्यासोबत तिने एक हृदयस्पर्शी नोटही शेअर केली आहे. विराट कोहलीचे फोटो शेअर करत अनुष्का शर्माने लिहिले- “मी नेहमीच तुझी साथ देईन, कधीही आणि कोणत्याही परिस्थितीत”. अनुष्काच्या या पोस्टवर विराट कोहलीने हार्ट इमोजी पोस्ट करत कमेंट केली आहे.

विराट कोहलीच्या शतकानंतर सोशल मीडियावर चाहते त्याचे कौतुक करताना दिसत आहेत, तसेच युजर्स अनुष्काच्या पोस्टवर आपली प्रतिक्रियाही देत आहेत. तर अनेक सेलिब्रेटी विराटचे कौतुक करताना दिसत आहेत. श्रद्धा कपूरनेही यावर कमेंट केली आहे तिने लिहिलं, “किती भारी क्षण होता.” याशिवाय सोनाली बेंद्रे, वरुण धवन, जयदीप अहलावत यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी हार्ट इमोजींसह प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अनुष्काच्या कामाबद्दल बोलायचं तर, लवकरच ती क्रिकेट खेळताना दिसणार आहे, ती ऑफस्क्रीन नव्हे तर ऑनस्क्रीन क्रिकेट खेळताना दिसणार आहे. अभिनेत्री सध्या आगामी चित्रपट झुलन गोस्वामीच्या बायोपिकचं शूटिंग करत आहे. या चित्रपटाद्वारे ती बऱ्याच दिवसांनी मोठ्या पडद्यावर परतणार आहे. अनुष्का २०१८ मध्ये झिरो या चित्रपटात शेवटची दिसली होती.