अनुष्का शर्माकडे आहेत या महागड्या वस्तू (Anushk...

अनुष्का शर्माकडे आहेत या महागड्या वस्तू (Anushka Sharma has These Expensive and Luxury Things, You will be Shocked to Know)

बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली ही प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. विराट आणि अनुष्का 2013 मध्ये एका शॅम्पूच्या जाहिरातीदरम्यान पहिल्यांदा भेटले होते, त्यानंतर दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. आज हे जोडपे त्यांच्या सुखी वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहेत. दोघांनाही एक मुलगी आहे. दोघेही खूप अलिशान आयुष्य जगतात.

बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये अनुष्काच्या नावाचा समावेश होतो, तर विराट कोहली हा क्रिकेट जगतातील दिग्गज खेळाडू मानला जातो. दोघेही आपापल्या क्षेत्रात खूप यशस्वी आहेत आणि सध्याच्या सर्वात श्रीमंत भारतीय सेलिब्रिटी जोडप्यांपैकी एक आहेत. विशेषत: अनुष्काबद्दल सांगायचे तर ती अनेक महागड्या आणि लक्झरी वस्तूंची मालक आहे.

अनुष्का शर्मा ही एक टॉपची अभिनेत्री तर आहेच पण ती एक बिझनेस वुमनसुद्धा आहे. 2017 मध्ये अनुष्काने आपला ब्रँड ‘नुश’ लॉन्च केला होता. या कपड्यांच्या ब्रँडची सध्याची मार्केट व्हल्यू 65 कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. तिचा व्यवसाय चांगला चालतो आणि त्यातून तिला भरपूर पैसेही मिळतात.

अनुष्का शर्माचे मुंबईतील लोखंडवाला येथे आलिशान ऑफिस आहे, तिथे तिच्या सर्व मीटिंग्स होतात. याच ऑफिसमधून ती आपला भाऊ कर्णेशसोबत प्रॉडक्शन हाऊस चालवते. तिच्याकडे अनेक आलिशान गाड्याही आहेत. त्या गाड्यांची किंमत कोटींच्या घरात आहे.

अनुष्काच्या आलिशान घरांबद्दल सांगायचे तर, 2012 मध्ये, अभिनेत्रीने वर्सोवा येथील बद्रीनाथ टॉवर्समध्ये एक भव्य ट्रिपलेक्स अपार्टमेंट खरेदी केले होते, त्याची किंमत सुमारे 10 कोटी रुपये आहे. अनुष्काकडे अंधेरीच्या यारी रोडवर 3 BHK लक्झरी फ्लॅट आहे, त्याची किंमत सुमारे 4 कोटी रुपये आहे.

अनुष्काच्या कमाईबद्दल बोलायचे तर ती चित्रपट आणि जाहिरातींमधून भरपूर कमाई करते. इतकंच नाही तर ती चित्रपटांमध्ये पैसे गुंतवून मोठा नफाही कमावते. अनुष्का तिच्या एका चित्रपटासाठी 10 ते 12 कोटी रुपये मानधन घेते, तर एका जाहिरातीसाठी ती 4-5 कोटी रुपये घेते. अभिनेत्री जवळपास 265 कोटी रुपयांच्या संपत्तीची मालक आहे.

फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम