…म्हणून अनुष्का शर्माला करायचा नव्हता सुल...

…म्हणून अनुष्का शर्माला करायचा नव्हता सुलतान चित्रपट (Anushka Sharma Did Not Want To Do Film ‘Sultan’, You Will Be Stunned To Know The Reason)

अनुष्का शर्मा ही बॉलिवूडमधील सर्वात हुशार अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. करीअरच्या पहिल्याच चित्रपटात तिला शाहरुख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली होती. यानंतर अनुष्काने एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आणि इंडस्ट्रीत आपले खास स्थान निर्माण केले. पण अनुष्काला सलमान खानसोबत ‘सुलतान’ चित्रपटात काम करायचे नव्हते.

अनुष्का शर्माचा जन्म 1 मे 1988 ला अयोध्या, यूपीमध्ये झाला. तिचे वडील सैन्यात अधिकारी पदावर आहेत, तर आई गृहिणी आहे. यूपी व्यतिरिक्त अनुष्काच्या आजीचे घर डेहराडूनला असल्यामुळे त्या शहराशीही तिचे घट्ट नाते आहे.

अनुष्का शर्माला एक भाऊ असून तोही फिल्म इंडस्ट्रीत निर्माता आहे. तो अनुष्का शर्माची प्रोडक्शन कंपनी सांभाळतो. यूपीमध्ये जन्मलेल्या अनुष्काचे बालपण बंगळुरूमध्ये गेले. प्रसिद्ध क्रिकेटर महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी अनुष्काची वर्गमैत्रीण होती.

अनुष्काला मॉडेलिंगमध्ये करीअर करायचे होते. त्यामुळे तिने अभिनेत्री होण्याचा कधीच विचार केला नव्हता. पण अचानक तिला या अभिनय क्षेत्रात करीअर करण्याची इच्छा झाली. आणि मग तिने चित्रपटांसाठी ऑडिशन देण्यास सुरुवात केली.

चित्रपटांमध्ये अनुष्का शर्माने अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या. पण जेव्हा तिला ‘सुलतान’ चित्रपटाची ऑफर आली तेव्हा तिला तो चित्रपट करण्यास नकार द्यावासा वाटला. त्याचे कारण होते तिची शरीरयष्टी. अनुष्काला वाटत होतं की तिचं शरीर कुस्तीपटूसारखं दिसत नाही. मात्र, तरी तिने पडद्यावर हे पात्र अगदी खरे वाटावे यासाठी कोणतीही कसर सोडली नाही.

अनुष्का शर्माबद्दल बोलायचे झाल्यास तिने भारताचा सुप्रसिद्ध क्रिकेटपटू विराट कोहलीसोबत लग्न केले. या दोघांना आता एक मुलगी असून तिचे नाव वामिका असे आहे. अनुष्का सध्या आपल्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहे.

फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम