बाळंतपणानंतर पहिल्यांदाच दिसली अनुष्का शर्मा, व...

बाळंतपणानंतर पहिल्यांदाच दिसली अनुष्का शर्मा, विराट कोहलीसोबत. मुलीच्या चेकअपसाठी बाहेर आले (Anushka Sharma And Virat Kohli Spotted For The First Time After Birth Of Their Baby)

बॉलीवुडमधील सर्वात आवडतं जोडपं अनुष्का शर्मा आणि विराट कोहली याच महिन्यात एका गोंडस मुलीचे पालक झाले. त्यानंतर, पहिल्यांदाच बांद्रा येथे त्या दोघांना एकत्र पाहिले गेले.

मुलीच्या जन्मानंतर दोघंही नवरा-बायको पहिल्यांदाच पाहिले गेल्यामुळे त्यांचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

विराट आणि अनुष्का बांद्र्याला आपल्या मुलीला नियमित चेकअपसाठी दवाखान्यात घेऊन गेले होते.

दरम्यान काही फोटोग्राफर्संनी या जोडप्यास पाहून फोटो क्लिक करायलाच सुरुवात केली. आणि गंमत म्हणजे या स्टार कपल विराट आणि अनुष्काने देखील आनंदाने पोज दिल्या.

मुलीला जन्म दिलेल्याला जेमतेम दहा-बारा दिवसच झाले असूनही या फोटोंमधे अनुष्का शर्मा बाळंतपणाच्या अगोदर जशी फिट होती तशीच ती आताही दिसली.

अतिशय आनंदी असलेल्या दोघांनीही फोटोग्राफर्सच्या सांगण्यावरून मस्त आणि स्टायलिश पोजेस्‌ दिल्या.

या फोटोंमध्ये अनुष्का कम्पलीट डेनिममध्ये तर विराट कोहली ब्लॅक आउटफिट मध्ये असून दोघंही स्टायलिश दिसत आहेत.

काही दिवसांपूर्वीच विराट कोहलीने मुलगी झाल्याची गोड बातमी सोशल मिडियावर पोस्ट करत आपल्या चाहत्यांचे प्रेम आणि त्यांच्या शुभेच्छांसाठी आभार मानले होते.