अनुषा दांडेकर मराठी चित्रपटात : चित्रपट स्कॉटलं...

अनुषा दांडेकर मराठी चित्रपटात : चित्रपट स्कॉटलंडमध्ये चित्रित (Anusha Dandekar Plays Lead Role In Marathi Film; Film Shot In Scotland)

ती आणि ती, वेल डन बेबी आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या व्हिक्टोरीया या तीन चित्रपटांच्या यशानंतर निर्माते आनंद पंडित आणि पुष्कर जोग यांच्या निर्मिती संस्था अनुक्रमे आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि गूसबम्प्स एंटरटेनमेंट यांनी एकत्रित निर्मिती केलेल्या चौथ्या चित्रपटाची घोषणा आज सोशल मीडियावर केली. या चित्रपटाचे शूटिंग देखील स्कॉटलंड मध्ये झाले आहे .

या चित्रपटाच्या प्रमुख भूमिकेत पुष्कर जोग, अनुषा दांडेकर, कुशल बद्रिके, शुभांगी गोखले आणि बाल कलाकार कीया इंगळे हे आहेत. योगेश फुलपगार हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

बाप माणूस चे निर्माते आनंद पंडित, रूपा पंडित आणि पुष्कर जोग आहेत तर सह निर्माते – वैशाल शाह, राहुल व्ही दुबे हे आहेत

पुष्कर जोग आणि अनुषा दांडेकर पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. अनुषा बऱ्याच वर्षांनी मराठी चित्रपटात काम करणार आहे.