अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यपच्या हॉट बिकिनी...

अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यपच्या हॉट बिकिनी फोटोजची इंटरनेटवर धम्माल, पाहा आलियाचे हॉट फोटोज् (Anurag Kashyap’s daughter Aaliyah Kashyap sets internet on fire with her bikini pictures, See Hot Pics)

फिल्म निर्माता अनुराग कश्यप वादग्रस्त म्हणून नेहमीच चर्चेत असतात, आता त्यांची मुलगी आलियाही सतत चर्चिली जाऊ लागली आहे. बॉलिवूडपासून दूर असूनही, सोशल मीडियावरील तिच्या हॉट फोटोजमुळे ती नेहमीच प्रसिद्धी मिळवत असते. अलीकडेच तिने शूट केलेले बिकिनीमधील फोटो इंटरनेटवर कमालीचे लोकप्रिय ठरत आहेत.

या फोटोने संपूर्ण सोशल मीडियावर धमाल माजविली आहे. आपल्या हॉट फिगरचे बिकिनीमधील फोटो शेअर करण्याची आणि धमाल माजविण्याची आलियाची ही पहिलीच वेळ नाही आहे.

आलिया ही अनुराग कश्यप यांची पहिली पत्नी आरती बजाज यांची मुलगी असून ती फक्त २० वर्षांची आहे. अनुरागने २००३ साली फिल्म एडिटर आरती बजाज यांच्याशी लग्न केले, आणि २००९ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. आलिया बरेचदा आपल्या वडिलांसोबतच दिसते. अनुरागही आपल्या लेकीसोबतचे फोटो शेअर करत असतात. या फोटोंमध्ये त्यांचे आपल्या मुलीसोबतचे छान बाँडिंग दिसून येते.

आलिया आपल्या वडिलांसारखी बोल्ड आहे. इंस्टाग्रामवरील तिच्या फोटोंवरून तिच्या बोल्डनेसचा अंदाज लावता येतो.

अतिशय लोकप्रिय आणि आपल्या स्टाईलमुळे नेहमी सोशल मीडियावर चर्चिल्या जाणाऱ्या आलियाचे इंस्टाग्रामवर एक लाख ऐंशी हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत. याशिवाय आलियाचं यू-ट्यूब चॅनेलही आहे, जिथे ती आपले मेकअप, स्टायलिंग आणि नेहमीचे ब्लॉग्स शेअर करत असते.

फोटो सौजन्य: Instagram

आलियाची स्टाईल आणि देहबोली पाहता तिला अभिनय करण्यामध्ये रस असल्यासारखं वाटतं. आणि अनुरागकडूनही तिला तशी संमती आहे. ”तिला बॉलिवूडमध्ये यायचं असल्यास तिचं स्वागत आहे. परंतु या इंडस्ट्रीमध्ये नाव कमवायचे असल्यास तिला स्वतःला प्रयत्न करावे लागतील,” असं ते म्हणतात.