अनुपम खेरने आपला नवा चित्रपट सिग्नेचर चा फर्स्ट...

अनुपम खेरने आपला नवा चित्रपट सिग्नेचर चा फर्स्ट लूक शेअर केला ( Anupam Kher Shares The First Look Of His New Film ‘Signature’)

अभिनेता अनुपम खेरने सोमवारी सोशल मीडियावर आपला नवा चित्रपट ‘सिग्नेचर’ चा फर्स्ट लूक शेअर केला.या पोस्टरमध्ये अनुपम एका वृद्ध व्यक्तीच्या वेषात रस्त्याच्या कडेला उभे असलेले दिसतात. या शिवाय चित्रपटात एक अशी अभिनेत्री आहे जिने अनेक अॅडल्ट वेब सिरीजमध्ये काम केले आहे.

ही अभिनेत्री म्हणजे स्नेहा पॉल जिने उल्लू अॅपवर 18+ वेबसिरीजमध्ये काम केले आहे. स्नेहाची ‘चरमसुख- चॉल हाउस’ ही वेबसीरिज खूप चर्चेत होती. या सिरीजमध्ये स्नेहाने एका गृहिणीची भूमिका साकारली होती. या सिरीजमध्ये स्नेहा खूपच हॉट दिसत होती. तिने या सिरीजमध्ये अनेक हॉट सीन्स आणि किसिंग सीन्स दिले आहेत.

ही सिरीज ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सगळ्यात बोल्ड सिरीजपैकी एक मानली जाते. त्यामुळे ती  सिरीज एकट्याने पाहणेच शहाणपणाचे ठरते. 25 फेब्रुवारी ला ही सिरीज प्रदर्शित करण्यात आली होती.

अभिनेत्री स्नेहा पॉलने सुद्धा तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर सिग्नेचर चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर करुन ती सुद्धा त्या चित्रपटात असणार असल्याची कल्पना तिच्या चाहत्यांना दिली आहे.

स्नेहा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. अनेकदा ती तिचे हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

वेब सिरीजमध्ये मादक अदांनी सगळ्यांना घायाळ करणारी स्नेहा तिच्या खऱ्या आयुष्यातसुद्धा खूप हॉट आणि बोल्ड आहे. जेव्हा ती संपूर्ण ड्रेसवर फोटो पोस्ट करते तेव्हा तिचे चाहते चकित होतात. अनेकदा ती तिच्या कुटुंबासोबत सुद्धा फोटो पोस्ट करत असते.

स्नेहाने तिच्या करीअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केलेली. त्यानंतर तिने कोलकाता येथे थिएटरमध्ये काम केले. पण तिला खरी ओळख चरमसुख सिरीजमधूनच मिळाली.