गायकांच्या मुलांचे वेगळे उद्योग (Anu Malik̵...

गायकांच्या मुलांचे वेगळे उद्योग (Anu Malik’s Daughter Is Fashion Designer, Alka Yagniks Daughter Is Restaurant Owner, Know About Other Playback Singer’s Children)

फिल्मी सिताऱ्यांच्या मुलांबाबत सगळ्यांना कुतूहल असते. ते काय करतात? अभिनेते बनू इच्छितात का? वगैरे वगैरे प्रश्न चाहत्यांच्या मनात असतात. पण याच चित्रसृष्टीतील महत्त्वाची माणसे म्हणजे पार्श्वगायक. त्यांची मुले नेमकी काय करतात? गायक बनू इच्छितात? की आणखी काय करतात? या प्रश्नांची ही उत्तरे आहेत.
अनू मलिक

बॉलिवूडचे गाजलेले संगीतकार अनू मलिक यांना दोन सुंदर मुली आहेत. अदा व अनमोल मलिक. अनमोल गायिका आहे, तर अदा फॅशन डिझायनर.
अलका याज्ञिक

बॉलिवूडची सुप्रसिद्ध गायिका अलका याज्ञिकची मुलगी आहे सायशा कपूर. तिनं आईचे गायन क्षेत्र न निवडता लंडनच्या स्कूल ऑफ मार्केटिंग मधून एमबीए शिक्षण घेतले. अन्‌ हॉटेल व्यवसायात शिरली. मुंबईतील अंधेरी उपनगरात बॉवेडो प्रिस्टो हे रेस्टॉरंट चालवते. तिचं लग्न झालेलं आहे. अलका याज्ञिकने शिलाँग येथील एका उद्योगपतीशी लग्न केलं होतं. पण ते फार टिकलं नाही. अलकाने एकटीने सायशाचे संगोपन केले.
लकी अली

गेल्या काही दिवसांपासून प्रकाशात आलेला गायक लकी अली याची तीन लग्नं झाली आहेत. त्यामधून त्याला पाच मुले झाली आहेत. पहिल्या व दुसऱ्या बायकोपासून त्याला प्रत्येकी दोन तर तिसऱ्या बायकोपासून एक मुलगा झालेला आहे. या पाचपैकी एक मुलगी तस्मिया हिला वडिलांप्रमाणेच गाण्याची आवड आहे.
सुनिधी चौहान

सुप्रसिद्ध पार्श्वगायिका सुनिधी चौहान हिने दोन वर्षांपूर्वी एका मुलाला जन्म दिला. तिचं पहिलं लग्न बॉबी खानशी झालं होतं. त्याच्याशी घटस्फोट घेऊन सुनिधीने हितेश सोनिकशी लग्न लावलं. पण आठ वर्षानंतर ते वेगळे झाले.
सोनू निगम

सोनू निगमचा मुलगा निवान अतिशय गोड दिसतो. त्यामुळे तो चर्चेत असतो. तो बऱ्यापैकी गातो; पण काही महिन्यांपूर्वी सोनू निगमने जाहीर केले की, ”आपण त्याला गायक बनवणार नाही अन्‌ भारतात तर मुळीच नाही. तो जन्मजात गायक असला तरी इतर क्षेत्रात रुचि आहे. आता तो युएईच्या टॉपमोस्ट गेमर्समध्ये शुमार आहे.”
कुमार शानू

कुमार शानूची दोन लग्नं झालेली आहेत. पहिली बायको रीता भट्टाचारजी हिच्यापासून त्याला तीन मुलगे झाले. जान, जिको, जेसी ही त्यांची नावे. पैकी जान शानू ‘बिग बॉस १४’ चा एक स्पर्धक होता. बऱ्याच वर्षानंतर कुमार शानूने सोनाली भट्टाचारजीशी लग्न केलं. तिच्यापासून त्याला दोन मुली झाल्या. त्यांची नावे शैनन आणि एन्ना अशी आहेत.
शंकर महादेवन

सिद्धार्थ आणि शिवम महादेवन असे सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांचे दोन सुपुत्र आहेत. सिद्धार्थ संगीतकार आहे.
उषा उत्थुप

इंडी-पॉप गायिका उषा उत्थुपला दोन मुले आहेत. सनी व अंजली. अंजलीला आईसारखाच गाण्याचा छंद आहे.
पंकज उधास

गझल गायक म्हणून ख्यातनाम असलेल्या पंकज उधासला दोन मुली आहेत. रीवा आणि नयाब अशी त्यांची नावे आहेत. वर्षभरापूर्वी पंकजने नयाबचे धूमधडाक्यात लग्न लावून दिले.

१० लोकप्रिय टी.व्ही. तारकांचे सिक्रेट टॅटू