बॉडी ट्रान्सफॉर्मेशननंतर बिकिनीमधील फोटो शेअर क...

बॉडी ट्रान्सफॉर्मेशननंतर बिकिनीमधील फोटो शेअर करत अंशुला कपूर लिहिते, ‘आपल्या शरीरावरील स्ट्रेच मार्क्स लपविण्याची गरज नाही, शरीरावर प्रेम करा.’ (Anshula Kapoor shares photo in bikini, writes powerful note on body positivity-‘Don’t hide your fats, love your body)

बोनी कपूरची मुलगी आणि अर्जुन कपूरची बहीण अंशुला सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अंशुला कायमच सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करते. अंशुला चित्रपटांपासून दूर असली तरी बॉडी पॉझिटीव्हीटी आणि सेल्फ लव्ह यावरील तिच्या पोस्ट प्रेरणादायी असतात.

अंशुलाने अलिकडेच तिचे वजन कमी केले आहे. वजन कमी करण्याचा तिचा हा प्रवास तिने लोकांसोबत शेअर केला आहे तसेच वजन कमी करण्यासाठी तिने काय मेहनत घेतली हे देखील या आधी तिने सांगितले आहे.

अंशुलाने तिचा एक बिकिनीवरील फोटो पोस्ट केला आहेत. या फोटोंमध्ये तिने निळ्या रंगाची बिकिनी घातली आहे. सोबतच मोठी पोस्ट लिहिली आहे. अंशुलाने तिच्या पोस्टमध्ये एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडलाय. तिने लिहिले की, “तीन महिन्यांपूर्वी मी @priyamganeriwal शी बोलत होते की मी कधीही बिकिनी घालणार नाही कारण माझ्यात इतका आत्मविश्वास नाही. अंशुलाचे म्हणणे ऐकून प्रिया म्हणाली, का नाही. तू हे घातले पाहिजे. तेव्हा माझ्या मनात बिकिनीबद्दल एक संकोच निर्माण झाला होता. मला असे वाटायचे की विशिष्ट कपडे घालण्यासाठी विशिष्ट शरीराची आवश्यकता असते. पण आता मी स्वतःला बदलणे शिकली आहे.”

अंशुलाने म्हटले आहे की, “बरेच दिवस ही प्रतिमा गॅलरीत पडून होती, मी माझ्या आधीच्याच शरीराच्या प्रतिमेतून बाहेर येऊ शकले नव्हते. मला वाटले परफेक्ट बॉडी असलेला फोटोच पोस्ट करावा. मी यावर खूप विचार केला आणि नंतर लक्षात आले की नाही, आपल्याला आपल्या शरीराचे स्ट्रेच मार्क्स लपवण्याची गरज नाही. मी माझ्या शरीरावर प्रेम करायला शिकत आहे, त्या दिवसांतही जेव्हा आपले शरीर स्थूल असते किंवा ते चांगले दिसत नाही. स्ट्रेच मार्क्स हे सामान्य आहेत, ते लपविण्याची गरज नाही.”

“आपण स्वतःच्या शरीरावर प्रेम केले पाहिजे. यामुळेच ही सुट्टी माझ्या आवडत्या सुट्ट्यांपैकी एक आहे. मला आनंद आहे की मी बिकिनी घातली आहे आणि मला पूर्वीपेक्षा अधिक आरामदायक आणि मोकळं वाटत आहे.” असं ती म्हणत आहे. अंशुलाची ही पोस्ट लोकांच्या पसंतीस उतरत आहे.  चाहते तिच्यामधील बदलाचे आणि आत्मविश्वासाचे खूप कौतुक करत आहेत. अंशुला तिच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. फिट झाल्यापासून, ती सोशल मीडियावर सतत प्रेरणादायी पोस्ट शेअर करते आणि लोकांना प्रेरणा देत असते.