अर्जुन कपूरची बहीण अंशुलाने चक्क कॅमेऱ्यासमोर क...

अर्जुन कपूरची बहीण अंशुलाने चक्क कॅमेऱ्यासमोर काढली ब्रा.. (Anshula Kapoor removes her bra in front of camera, Priyanka Chopra reacts)

निर्माता दिग्दर्शक बोनी कपूरची लेक आणि अभिनेता अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूर सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. बरेचदा ती शरीर सकारात्मक कसे ठेवावे व स्वत:वर प्रेम कसे करावे या संबंधी पोस्ट करत असते. ती तिचे मत सोशल मीडियावर अगदी बिनधास्त मांडते. अंशुलाच्या मते, आपल्या  शरीरात कितीही उणीवा असतील पण कोणत्याही परिस्थितीत आपल्याला शरीरावर प्रेम करायला हवे. काही दिवसांपूर्वी अंशुलाने एक व्हिडिओ शेअर केला होता. तो व्हिडिओ अनेक महिलांना योग्य देखील वाटला आहे. अंशुलाच्या त्या व्हिडिओचं खूप कौतुक होत आहे.

महिलांसाठी त्यांची अंतर्वस्त्र महत्वाची असतात. पण अनेकदा असे दिसून येते की त्याच अंतर्वस्त्रामुळे महिला चिडचिड्या देखील होतात. काहींच्या मते ब्रा घालावी की नाही हा महिलांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यासाठी कोणीही महिलांवर जबरदस्ती करू शकत नाही. महिलांच्या या विचारसरणीला पाठिंबा देण्यासाठी ‘नो ब्रा कॅम्पेन’ आणि ‘नो ब्रा क्लब’ चालवले जात आहेत जेणेकरून महिलांना ब्राच्या बाबतीत निवडीचे स्वातंत्र्य मिळेल. या ‘नो ब्रा कॅम्पेन’ मध्ये आता अंशुला कपूरही सहभागी झाली आहे.

अंशुलाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत अंशुलाने तिची ब्रा काढली आणि तिला तसं केल्यामुळे किती मोकळं वाटलं ते तिच्या चेहऱ्यावरील हावभावावरुन दाखवलं. त्या व्हिडिओला कॅप्शन देत तिने लिहिले, रविवारी बाहेरुन खाऊन-पिऊन घरी आल्यावर सगळ्यात आवडणारे काम. या कॅप्शनला तिने नो ब्रा क्लब असा हॅशटॅग दिला आहे.

अंशुलाचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. अनेक महिला त्यावर आम्ही तुझ्याशी सहमत आहोत अशा कमेंट करत आहेत. अभिनेत्री प्रियंका चोप्राने त्या व्हिडिओवर कमेंट करत ‘दररोज’ असे लिहिले. तर एका युजरने हे मी नेहमीच करते असे लिहिले आहे ,तर दुसऱ्या युजरने खरंच हे खूप भारी काम आहे. तर आणखी एकीने कोरोनाचा काळ हा आमच्यासाठी रोजच रविवार होता असं कमेंटमध्ये म्हटलं आहे. तर काही लोकांनी अंशुलाला या व्हिडिओवरुन ट्रोल केले आहे.