‘तू चाल पुढं ‘ मालिकेला अन्नपूर्णा ...

‘तू चाल पुढं ‘ मालिकेला अन्नपूर्णा विठ्ठल यांचा रामराम ( Annapurna Vitthal Makes Good Bye To Serial ‘ Tu Chal Pudhe ‘ Before It’s Release )

झी मराठीवर सध्या नव्या ३ मालिका सुरु झाल्या आहेत. त्यामुळे या नव्या मालिकांची चर्चा जोरदार चर्चा सुरु आहे. १५ ऑगस्टपासून तू चाल पुढं ही नवी मालिका सुरु झाली आहे. या मालिकेत अभिनेत्री दिपा परब चौधरी तब्बल १४ वर्षांनी मराठी मालिकांमध्ये पुनरागमन करत आहे. गेले काही दिवस टीव्हीवर या मालिकेचा प्रोमो पाहायला मिळत आहे. सर्वसामान्य घरातील स्त्री आपल्या संसारासाठी कशी कसरत करते, ते कसे सावरते हे या मालिकेतून पाहायला मिळेल.

प्रेक्षकांकडून या मालिकेच्या प्रोमोला पसंती मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी या मालिकेचा प्रमोशन कार्यक्रम पार पडला. त्यावेळी या मालिकेतील सर्व कलाकार उपस्थित होते. या मालिकेत आदित्य वैद्य, धनश्री कडगावकर, देवेंद्र दोडके, वैष्णवी कल्याणकर आणि अन्नपूर्णा विठ्ठल हे कलाकार पाहायला मिळणार आहेत.

प्रमोशनच्या कार्यक्रमात हे सर्व कलाकार उपस्थित होते. मात्र मालिका सुरु झाल्यावर लगेचच या मालिकेतील पात्रांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्री अन्नपूर्णा विठ्ठल या मालिकेत दिसणार नाहीत. त्यांनी ही मालिका सोडली आहे.

अन्नपूर्णा यापूर्वी सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत काम करत होत्या. त्यांनी या मालिकेतील कलाकारांविरुद्ध चुकीची वागणूक देत असल्याची, अपमान करत असल्याची पोलिसांत तक्रारसुद्धा केली होती. त्यानंतर त्या झी मराठीवरील तू चाल पुढं या मालिकेत दिसणार होत्या. तसे त्यांचे काही प्रोमोसुद्धा आलेले. पण आता त्यांनी ही मालिका सोडली असून त्यांच्या जागी प्रतिभा गोरेगावकर दिसणार आहेत. अन्नपूर्णा यांनी ही मालिका का सोडली असा अनेकांना प्रश्न पडलेला.

या प्रश्नाचे उत्तर त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरुन दिले आहे. अन्नपूर्णा यांना हिंदीमधला नवा प्रोजेक्ट मिळाला आहे. सोनी सब या हिंदी वाहिनीवरील ‘अलीबाबा’ या नव्या मालिकेत त्यांची वर्णी लागली आहे. या मालिकेच्या गेटअप मधला एक फोटो त्यांनी शेअर केला आहे. मात्र त्यांनी या फोटोला, ‘कुछ लोग तुम्हारी कामयाबी की राह में हमेशा पत्थर फेकेंगे. अब ये तुम्हारे उपर निर्भर करता है तुम ऊन पत्थरों से क्या बनाते हो.

मुश्किलों की दिवार या कामयाबी का पूल’असे हटके कॅप्शन दिले आहे. अन्नपूर्णा यांनी तू चाल पुढं या मालिकेतून काढता पाय घेतल्याने अश्विनीची सासू म्हणजेच उज्वला वाघमारे हे पात्र अभिनेत्री प्रतिभा गोरेगावकर साकारतील. प्रतिभा यांनी या आधी अग्गबाई सासूबाई या मालिकेत सुलभाकाकूंची भूमिका साकारली होती.