‘दगडी चाळ 2’ मध्ये पुन्हा अंकुश चौधरी-पूजा सावं...
‘दगडी चाळ 2’ मध्ये पुन्हा अंकुश चौधरी-पूजा सावंत ही जोडी (Ankush Chowdhary And Pooja Sawant Is A Romantic Couple In ‘Dagdi Chawl 2’)

By Deepak Khedekar in सिने मराठी
‘दगडी चाळ २’ ची घोषणा झाल्यापासून सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती ती, यात कोणते चेहरे झळकणार ? हळूहळू हे चेहरे गुलदस्त्याबाहेर येऊ लागले असून आता प्रेक्षकांसमोर कलरफुल सोनल म्हणजेच पूजा सावंतची व्यक्तिरेखा समोर आली आहे. त्याचबरोबर सूर्या आणि सोनलच्या तरल प्रेमकहाणीच्या वेलीवर आता अंशुमन नावाचे ‘बटरफ्लाय’बसले आहे.


‘दगडी चाळ २’मध्ये प्रेक्षकांना सूर्या आणि सोनलचा मुलगाही पाहायला मिळणार आहे. नुकतेच त्याचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून एक कौटुंबिक कहाणी यात पाहायला मिळणार हे नक्की. मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित, चंद्रकांत कणसे दिग्दर्शित ‘दगडी चाळ २’ येत्या १८ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.