हॅलोविन लूकसाठी ट्रोल झाली अंकिता लोखंडे, तर कर...

हॅलोविन लूकसाठी ट्रोल झाली अंकिता लोखंडे, तर करण -तेजस्वी आणि अली जस्मिन यांनी आणली पार्टीत रंगत (Ankita Lokhande Trolled for Halloween Look, Karan-Tejasswi, Aly Goni-Jasmin Bhasin Steal The Show)

अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन यांनी काल आपल्या घरी हॅलोविन पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीसाठी इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रेटी त्यांच्या घरी हजर होते. पण या हॅलोविन पार्टीतील अंकिता लोखंडेच्या लूकमुळे तिला ट्रोल करण्यात आले. तर अली गोनी-जस्मिन भसीन, करण आणि तेजस्वी यांनी या पार्टीत रंगत आणली.

हॅलोविन पार्टीत अंकिता लोखंडेने सोनेरी आणि चंदेरी रंगाचे कपडे परिधान केले होते. त्यावर गळ्यात तिने गोल्डन चोकर घातला होता. केसांची स्टाइल करताना अभिनेत्रीने स्लीक बन बनवले होते.

दुसरीकडे, अंकिताचा पती विकी जैन हॅलोविन पार्टीत डॅपर लूकमध्ये दिसला. विकीने काळ्या जीन्स-ब्लॅक टी-शर्टसह ग्रे जॅकेट परिधान केला होता.

पण हे जोडपे त्यांच्याच हॅलोविन पार्टीत चाहत्यांना प्रभावित करू शकले नाही. युजर्सनी त्यांना त्यांच्या दिसण्यावरुन वाईट प्रकारे ट्रोल केले.

सोशल मीडियावर या पार्टीचे फोटो व्हायरल होताच लोक वेगवेगळ्या प्रकारचे कमेंट करत आहेत. एका युजरने अंकिताने तमन्ना भाटियाचा लूक कॉपी केल्याचे म्हटले आहे. एकाने काय करुन ठेवलयं असं कमेंटमध्ये विचारलं तर एकाने हा काय विचित्रपणा असा विचारले.

बिग बॉसचे स्पर्धक करण कुंद्रा-तेजस्वी प्रकाश आणि अली गोनी-जस्मिन भसीन यांनी अंकिताच्या पार्टीत रंगत आणली होती. करणने सोनेरी रंगाचा सूट घातला होता, तर तेजस्वी ब्लॅक स्ट्रॅपलेस ड्रेसमध्ये दिसली होती.

तर अली आणि जस्मिन यांनी काळ्या रंगाचे कपडे घातले होते.