साडीत खुलणारे अंकिता लोखंडेचे सौंदर्य (Ankita L...

साडीत खुलणारे अंकिता लोखंडेचे सौंदर्य (Ankita Lokhande Sizzles In Traditional Saree)

बहुचर्चित अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) काही दिवसांपूर्वी विवाहबद्ध झाले. त्यांचे लग्न, हळद, संगीत समारंभ खूप रंगले. कुणीही न पाहिलेले लग्नाचे फोटो, अंकिताने सोशल मीडियावर प्रसिद्ध करून खळबळ माजवली होती. तिचा नवरा विकी याने तिला मालदीव बेटांवरील ५० कोटींचा आलिशान बंगला, लग्नाची भेट म्हणून दिला, तेव्हा सगळ्यांचा आ वासला होता. या व लग्नानंतरच्या नाचगाण्यांच्या समारंभाने अधिकच प्रसिद्धी पावलेली अंकिता ही मराठी मुलगी आहे. लग्न व इतर समारंभाच्या निमित्ताने तिने फॅशनेबल, भरजरी ड्रेस घातले तरी पारंपरिक साडीमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते.

पूर्वी तिनं आपले साडीतले फोटो वेळोवेळी प्रसिद्ध केले आहेत, त्यातून याची प्रचिती येते. हिरवी साडी आणि दागिन्यांनी मढवलेली अंकिता मराठमोळ्या लूकमध्ये कशी छान दिसली आहे, ते पाहा

Ankita Lokhande
Ankita Lokhande

या आधी तिने आपल्या गुलाबी साडीतले फोटो प्रसिद्ध केले होते.

Ankita Lokhande
Ankita Lokhande

पांढरी साडी नेसून आपला कमनीय बांधा अंकिताने प्रकट केला होता. या साध्या साडीतही तिचे सौंदर्य खुललेले दिसते.

Ankita Lokhande

अंकिताने आता तिचे पिवळ्या नऊवारी साडीतले फोटो पोस्ट करून त्यावर प्रेमाबद्दलच्या खूपच छान ओळी लिहिल्या आहेत. या फोटोंत मराठमोठ्या साजशृंगारातील अंकिताचा लूक मार डाला असा आहे.

Ankita Lokhande

अंकिताचे लग्नाचे, लग्नाअगोदरचे आणि आत्ताचे नुकतेच इन्स्टाग्रामवर शेअर केलेले फोटो पाहिले की तिने स्वतःचे लग्न मस्त एन्जॉय केले असल्याचे स्पष्ट कळतेय. त्यामुळे हे सर्व फोटो अगदी नजर लागण्यासारखे आहेत. तिच्या चाहत्यांकडूनही तिला तिच्या सर्व फोटोंसाठी छान प्रतिक्रिया मिळत आहेत.