दिवस गेले असल्याच्या अफवांना पूर्णविराम देत अंक...

दिवस गेले असल्याच्या अफवांना पूर्णविराम देत अंकिता लोखंडे म्हणाली,’ मी स्वत:च छोटं बाळ आहे?’ (Ankita Lokhande Shuts Pregnancy Rumours On DID Super Moms, Actress Says- ‘Mai Khud Baby Hu’)

अंकिता लोखंडेला दिवस गेले असल्याची चर्चा खूप दिवसांपासून चालू आहे. मात्र अलीकडेच ‘ डान्स इंडिया डान्स- सुपर मॉम्स’ या कार्यक्रमाच्या दरम्यान तिला या संदर्भात विचारलं, तेव्हा तिनं फारच मजेशीर उत्तर दिलं.

अलीकडेच या कार्यक्रमाचा एक प्रोमो प्रसारित झाला. यामध्ये अंकिता, ‘डान्स इंडिया डान्स’ या कार्यक्रमाची एक परीक्षक उर्मिला मातोंडकर सोबत तिच्याच रंगीला चित्रपटातील गाण्यावर नाच करताना दिसते आहे.  तो झाल्यावर कार्यक्रमाचा सूत्रधार जय भानुषाली अंकिताला विचारतो, ‘तू सुपर मॉम कधी होणार ते सांग पाहू.’ यावर अंकिता लहान मुलाच्या आवाजात उत्तर देते,’ स्वतःच तर एक छोटं बाळ आहे.’

अंकिताचे हे मजेशीर उत्तर ऐकून पवित्र रिश्ता या मालिकेत तिच्या सासूची भूमिका करणारी उषा नाडकर्णी ‌ म्हणते,’ इकडे ये’ आणि आपल्या मांडीवर डोकं ठेवायला खुणेने सांगते. हे सगळं बघून कार्यक्रमाचे परीक्षक आणि इतर लोक खो खो हसायला लागतात. अंकिताने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा प्रोमो प्रसारित केला आहे.

या प्रमोद अंकिताने पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे.‌ त्यात ती सुंदर दिसते आहे.  गळ्यात तिने फारच छान नेकलेस घातला आहे.

अंकिताने गेल्याच वर्षी आपला बॉयफ्रेंड विकी याच्याशी लग्न केलं होतं. तिला दिवस गेल्याच्या अफवा बऱ्याच दिवसापासून पसरत होत्या. पण अंकिताने आपल्या मजेशीर उत्तराने त्यांना पूर्णविराम दिला आहे.