अंकिता लोखंडेचे ब्लॅक मोनोकिनी मधील मादक फोटो (...

अंकिता लोखंडेचे ब्लॅक मोनोकिनी मधील मादक फोटो (Ankita Lokhande Shows Her Bold Style in Black Monokini, Actress Pool Photos Goes Viral)

‘पवित्र रिश्ता’ या गाजलेल्या मालिकेतून अर्चनाची अदाकारी सादर करून घराघरात पोहचलेली अंकिता लोखंडे आजकाल आपली खूपच टिमकी वाजवू लागली आहे. ती आपला ब्रॉयफ्रेंड विकी जैन बरोबर सिमल्यामध्ये हॉलिडे एन्जॉय करते आहे. अन्‌ आपले दिलखेचक फोटो आणि व्हिडिओज्‌ प्रसिद्ध करून चाहत्यांना आकर्षित करते आहे.

Photo Credit: Instagram

नुकतीच तिने इन्स्टाग्राम हॅन्डलवरून आपली छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. ब्लॅक मोनोकिनी घालून अंकिता स्विमिंग पूलमध्ये आपली बोल्ड इमेज प्रस्थापित करते आहे. या तोकड्या कपड्यांमधील तिचे हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. त्यांना भरपूर लाईक्स मिळाले आहेत व चाहत्यांनी बऱ्याच कमेंट्‌स दिल्या आहेत.

Photo Credit: Instagram

Photo Credit: Instagram

आपले मदमस्त फोटो शेअर करून अंकिताने कॅप्शन लिहिली आहे – इतना आसान मत बनो. ब्लॅक मोनोकिनी घालून पोहण्याच्या तलावात ती डुंबत असल्याचे हे ३ फोटो आहेत.

Photo Credit: Instagram

Photo Credit: Instagram

असे काळ्या तोकड्या कपड्यांमधील फोटो शेअर करून अंकिताने, आपला ब्रॉयफ्रेंड विकी जैन सोबतचे २ फोटो प्रसिद्ध केले आहेत. हे फोटो त्यांच्या सिमला व्हेकेशनचे दिसत आहे. त्यावर तिने भाष्य केले आहे – व्हॅलेंटाईन डायरीज्‌ २०२१ सिर्फ और सिर्फ एक मिस्टर जैन के साथ. या फोटोंवर चाहत्यांनी आपली पसंती दर्शविली आहे.
सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वीच अंकिताने आपला ब्रॉयफ्रेंड विकी जैनसोबत शानदारपणे व्हॅलेंटाईन डे साजरा केला होता. त्या व्हिडिओमध्ये रात्री त्या दोघांना जिथे व्हॅलेंटाईन डे साजरा करायचा होता, तिथे जाताना दिसत आहेत.

Photo Credit: Instagram

या दिवसाचे सेलिब्रेशन करताना त्याचा व्हिडिओ अंकिताने श्अेर करून म्हटले होते, – “आपण लोक माझ्यासाठी जे काही करताय्‌ त्याबद्दल मी आपली आभारी आहे. एवढंच माझं म्हणणं आहे.” या व्हिडिओमध्ये अंकिता, विकी जैनसह रोमॅन्टिक डिनर घेताना दिसत आहे.
छोट्या पडद्यावरून आपल्या ॲक्टिंग करिअरची सुरुवात करणाऱ्या अंकिताने बॉलिवूड फिल्ममध्ये देखील आपली अदाकारी गाजविली आहे. ‘मणिकर्णिका’ या चित्रपटात झलकारी बाईच्या भूमिकेत ती दिसली होती. शिवाय ‘बागी ३’ मध्ये पण तिची भूमिका लक्षणीय ठरली होती. या चित्रपटात रितेश देशमुख, श्रद्धा कपूर, टायगर श्रॉफ यांच्यासोबत ती दिसली होती.
छोट्या आणि मोठ्या पडद्यावर चमकलेली अंकिता सोशल मीडियावर चमकणाऱ्या अभिनेत्रींमध्ये उच्च स्थानावर आहे. त्यामुळेच की काय, ती जे काही फोटो व व्हिडिओज्‌ इथे पाठवते, ते चाहत्यांना पसंत पडतात.