अंकिता लोखंडेने प्रसिद्ध केले कुणीही न पाहिलेले...

अंकिता लोखंडेने प्रसिद्ध केले कुणीही न पाहिलेले लग्नाचे फोटो : नवदांपत्यांनी एकमेकांवर व्यक्त केले प्रेम (Ankita Lokhande Shares Unseen Pictures From Her Wedding, Couple Showers Love On Each Other)

गेल्या अनेक दिवसांपासून ज्या लग्नसोहळ्याची चर्चा रंगली होती, तो विवाहसोहळा नुकताच पार पडला. अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) बॉयफ्रेंड विकी जैनसोबत (Vicky Jain) लग्नाच्या ‘पवित्र नात्यात’ अडकली आहे. मुंबईतील पंचतारांकित ग्रॅंड हयातमध्ये अंकिता आणि विकी यांचा विवाहसोहळा पार पडला. कुटुंबिय आणि जवळच्या मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत दोघांनी सात फेरे घेतले. लग्नानंतर अंकिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो लागलीच व्हायरल झाले असून चाहते अंकिता आणि विकी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

Ankita Lokhande

अंकिताने कुणीही न पाहिलेले लग्नाचे जे फोटो प्रसिद्ध केले आहेत, त्यात दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसून येत आहेच शिवाय नवदांपत्यांचे एकमेकांवरील प्रेमही व्यक्त होताना दिसतंय. या फोटोंना कॅप्शन देत अंकिताने, ‘आता आम्ही अधिकृतपणे मिस्टर आणि मिसेस जैन बनलो आहोत,’ असे म्हटले आहे.

Ankita Lokhande

लग्नाचे विधी करताना अंकिताने गोल्डन लेहंगा घातला होता. त्यासोबत तिने अतिशय जड अशी ज्वेलरी घातली होती. हेवी पेहरावामुळे ती रॉयल ब्राइड दिसत होती. भारी नेकपीस, बिंदी, नथ, गोल्डन बांगड्या अशा नववधूच्या रुपामध्ये अंकिता अतिशय सुंदर दिसत होती. तिच्या या नववधूच्या सौंदर्याची इंटरनेटवर वाहवा होत आहे. तर विकी कौशलनेही लग्नात त्याच्या पोशाखासाठी बेज-गोल्ड कलर निवडला होता.

Ankita Lokhande
Ankita Lokhande
Ankita Lokhande

लग्नाच्या मंडपातील अंकिताची एंट्रीही अफलातून होती. अंकिताने तिचा चेहरा पदराने झाकून मंडपात प्रवेश केला, तेथे विकी तिची वाट पाहत होता. तिचा त्यावेळचा हा लूक नेटकऱ्यांना वेड लावत आहे.

Ankita Lokhande
Ankita Lokhande
Ankita Lokhande

जोडप्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून जाताना दिसत असला तरी फेऱ्यांआधी अंकिता भावूक झाली आणि विकीच्या मिठीत जाऊन रडली.

Ankita Lokhande
Ankita Lokhande

लग्नासंबंधीचे पारंपरिक विधी करतानाही उभयतांमधील प्रेम दिसून येत होते. फोटोंमध्ये त्यांच्यातील बॉण्डिंगही पाहून चाहत्यांनाही त्यांच्याबद्दल प्रेम वाटू लागले आहे.

याआधी अंकिताने त्यांच्या प्री वेडिंग सोहळ्याचे फोटोही शेअर केले होते, ते देखील चाहत्यांना प्रचंड आवडले होते.

फोटो सौजन्य – सर्व फोटो इन्स्टाग्राम