“भूमिकांची निवड मी चोखंदळपणे करते” – अंकिता लोख...

“भूमिकांची निवड मी चोखंदळपणे करते” – अंकिता लोखंडे (Ankita Lokhande Says, She Is Very Selective About Her Film Roles)

काल-परवाच करवा चौथ व्रताबद्दल आपली पोस्ट टाकून पुन्हा प्रकाशात आलेली अंकिता लोखंडे चित्रपटातही फारशी दिसत नाहिये. मणिकर्णिका, बागी-३ यासारख्या चित्रपटातून तिची कामगिरी उठावदार होती. आपण चित्रपट स्वीकारताना फार चोखंदळ आहोत, अशी तिची विचारधारा आहे.

अंकिता म्हणते, “मी चित्रपटांची निवड विचारपूर्वक करते, हे खरं आहे. कारण मला असं वाटतं की, जे पात्र मी पडद्यावर साकार करीन, त्याबाबत प्रेक्षकांना आपुलकी वाटली पाहिजे. प्रेक्षक आणि कलाकार यांच्यात काही नाते असले पाहिजे. म्हणूनच मी भूमिका निवडताना चोखंदळ असते.”

आपण ८० व ९० च्या दशकात जे चित्रपट पाहिलेत, त्यासारख्या भूमिका करायला मला आवडतील, असं सांगून अंकिता म्हणते की, संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात नायिकेची भूमिका करावी, हा माझा ड्रिम रोल असेल.

लग्नानंतर अंकिताचं रूप काही कमी झालेलं नाही. आपल्या सौंदर्याचं रहस्य सांगताना ती म्हणते, “आपण नेहमीच चांगला विचार केला पाहिजे. कारण आपले विचार आपल्या चेहऱ्यावर प्रकटतात. सकारात्मक विचार कराल, तर सौंदर्य देखील खुलून दिसेल.” डान्स आणि म्युझिक या आपल्या आवडत्या गोष्टी असून त्याच्याने आपल्याला एनर्जी मिळते, असं अंकिता सांगते.