अंकिता लोखंडेच्या हॉट फोटोशूटने वाढले इंटरनेटचे...

अंकिता लोखंडेच्या हॉट फोटोशूटने वाढले इंटरनेटचे तापमान (Ankita Lokhande Raises Temperature Of Internet With Her Hot Photoshoot)

पवित्र रिश्ता या मालिकेत संस्कारी मुलीच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे दिवसेंदिवस खूपच ग्लॅमरस होत आहे. अंकिताने नुकतेच इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले. काही दिवसांपूर्वीच तिने बोल्ड आणि सेक्सी फोटोशूट केले होते. तेच फोटो तिने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले. अंकिताचे हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. या फोटोत अंकिताने निळ्या रंगाचा घट्ट ड्रेस घातलेला पाहायला मिळतो.

या ड्रेसवर तिने न्यू़ड मेकअप केला असून केस मोकळे सोडले आहेत. लग्नानंतरचे अंकिताचे हे पहिले हॉट फोटोशूट आहे. तिच्या या बोल्ड फोटोंवर चाहते खूप घायाळ होत आहेत. तिच्या फोटोंवर कमेंट करत अनेकजण तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.

व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये अंकिता खूपच बोल्ड आणि हॉट दिसत आहे. फोटोत ती आपले अंगप्रदर्शन करत आहे. तिच्या किलर लूकने अनेकजण अगदी घायाळ झाले आहेत. फोटोतून तिचा आत्मविश्वास सुद्धा झळकून येत आहे.

यापूर्वीही अंकिताने अनेकदा फोटोशूट केले होते. मात्र विकी जैनसोबत लग्न झाल्यापासून तिचे हे पहिलेच फोटोशूट आहे. तिने शूटसंदर्भातील एक व्हिडिओसुद्धा शेअर केला आहे. या फोटोंवर एका चाहत्याने कमेंट करत म्हटले की,  गर्मीतसुद्धा तू तापमान वाढवत आहेस. तर एकाने आग लावलीस असे म्हटले तर काहींनी हॉटी आणि सेक्सी अशा कमेंट केल्या आहेत.

अंकिताही मुळची इंदूरची आहे. तिने एकता कपूरच्या पवित्र रिश्ता या मालिकेतून आपल्या करीअरची सुरुवात केली होती. याव्यतिरिक्त तिने बॉलिवूडमध्येही काम केले आहे. अंकिता कंगणा रणावतसोबत मणिकर्णिका आणि श्रद्धा कपूरसोबत बागी 3 मध्ये दिसली होती.