अंकिता लोखंडेने घरी होमहवन करून सुशांतच्या स्मृ...

अंकिता लोखंडेने घरी होमहवन करून सुशांतच्या स्मृती जागवल्या (Ankita Lokhande Performed The Havan On Sushant ’s First Death Anniversary)

सुशांत सिंह राजपूतची सहकलाकार आणि पूर्वाश्रमीची जिवलग मैत्रिण अंकिता लोखंडे त्याची कायम आठवण काढते नि सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करत असते. आज सुशांतच्या पहिल्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अंकिताने त्याच्या स्मृतींना उजाळा देत घरी होमहवन केले.

सुशांतच्या पहिल्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण सोशल मीडियावर ब्रेक घेणार असल्याचा निश्चय बाजूला सारून अंकिताने श्रद्धांजली अर्पण केली.

अंकिता लोखंडेने एक व्हिडिओ शेअर केला. त्यामध्ये ती आपल्या कुटुंबियांसह सुशांतसाठी होमहवन करताना दिसत आहे. त्याद्वारे तिने सुशांतच्या आत्म्याला शांती लाभो, अशी इच्छा व्यक्त केली.

याशिवाय अंकिताने, सुशांतसोबत घालवलेल्या काही आठवणींचा व्हिडिओ बनवून इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या तिच्या पोस्टला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले आहे.

आपण सर्वच जाणतो की, गेल्या वर्षी, याच तारखेला सुशांतच्या मृत्यूची दुःखद वार्ता मिळाली होती. १४ जून रोजी तो आपल्या वांद्रे येथील फ्लॅटमध्ये गूढरित्या मरण पावलेला आढळला होता. आता एक वर्षानंतर देखील त्याच्या मृत्यूचे गूढ उकलले नाही. त्याचे चाहते, त्याला न्याय मिळावा, अशी मागणी करत आहेत. तसेच आपल्या या आवडत्या कलाकाराला सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण करत आहेत.