गुलाबी ड्रेसमध्ये अंकिता लोखंडे दिसली इतकी रूपम...

गुलाबी ड्रेसमध्ये अंकिता लोखंडे दिसली इतकी रूपमती, कि चाहते बोलले – गुलाबी परी (Ankita Lokhande Looks Drop Dead Georgeous In Pink Dress : Fans Appreciated Her As Pink Angel)

अंकिता लोखंडे जितकी लोकप्रिय आहे, तितकीच रूपसुंदर आहे. अलीकडेच तिनं  एका गोड  गुलाबी ड्रेसमध्ये  फोटोशूट केलं. त्यातील तिचे रूप पाहून चाहत्यांची नजर तिच्यावर खिळून राहिली आहे.

या फोटोशूट मध्ये अंकिताने अतिशय आकर्षक घेरदार लेहंगा घातला आहे. तिचा हा ड्रेस आणि तिचं स्मित अतिशय आकर्षक दिसतोआहे. यावर तिने दागिने घातले नाही. ओठांवर ड्रेसला मॅचिंग असं गुलाबी लिपस्टिक आहे. या साधेपणावरच लोक घायाळ झाले आहेत.

आपल्या इंस्टास्टोरी वर हि मादक छायाचित्रे पोस्ट करून तिनं गाणं टाकलं आहे. “हम तो तुम पे मरे जा रहे है, मिटने की  जिद किये जा राहे है.”

हे फोटो वेगाने व्हायरल होत असून चाहते लिहिताहेत ‘ गुलाबी परी, ‘ ‘प्रेटी इन पिंक’.