अंकिता लोखंडे आणि विक्की जैन यांच्या घरी लगीनघा...

अंकिता लोखंडे आणि विक्की जैन यांच्या घरी लगीनघाई, लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात… (Ankita Lokhande And Vicky Jain’s Pre-Wedding Festivities Begin)

सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहत आहेत. अनेक लोकप्रिय जोड्यांनी साताजन्माच्या गाठी बांधल्या आहेत. छोट्या पडद्यावरील पवित्र रिश्ता या मालिकेतील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.

Ankita Lokhande, Vicky Jain’s, Pre-Wedding Festivities

अंकिता प्रियकर विकी जैनसोबत १४ डिसेंबरला लग्नगाठ बांधणार आहे. अंकिताच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. याचे काही फोटो अंकिता आणि विकीने आपापल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

Ankita Lokhande, Vicky Jain’s, Pre-Wedding Festivities

अंकिता हिरव्या आणि गुलाबी रंगाच्या साडीत दिसत आहे, तिने तिच्या हातात हिरवा चुडा भरला आहे, तर विकीने ऑफ व्हाइट कलरचा कुर्ता घातला आहे. दोघेही त्यांच्या पारंपरिक लूकमध्ये खूपच क्यूट दिसत आहेत.

Ankita Lokhande, Vicky Jain’s, Pre-Wedding Festivities

अंकिताने तिच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे – पवित्र तर विकीने मराठीत मी तुझ्यावर प्रेम करतो असे लिहिले आहे, त्यानंतर विकीने इंग्रजी आणि हिंदीमध्ये लिहिले आहे – पण पिक्चर अजून बाकी आहे, माझ्या मित्रा…

Ankita Lokhande, Vicky Jain’s, Pre-Wedding Festivities

गेल्या अनेक वर्षांपासून अंकिता आणि विकी दोघं एकमेकांना डेट करत आहेत. त्या दोघांनीही कुटुंबीयांना आणि मित्रपरिवाराला लग्नाचे आमंत्रण दिले असल्याचे म्हटले जात आहे. अंकिताने मालिकांसोबतच काही चित्रपटांमध्येही काम केले आहे. अंकिता सध्या पवित्र रिश्ता या मालिकेच्या दुसऱ्या पर्वात दिसत आहे.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम (सर्व फोटो)