डाएट न करता अभिनेत्री अनिता हंसनंदानी झाली स्लि...

डाएट न करता अभिनेत्री अनिता हंसनंदानी झाली स्लिम फिट (Anita Hassanandani Lost Pregnancy Weight Without Any Diet, Fans Are Shocked To See Her her Weight Loss Transformation)

अभिनेत्री अनिता हंसनंदानीने मुलगा आरवच्या जन्मानंतर अभिनयातून ब्रेक घेतला असून ती मातृत्वाचा आनंद घेत आहे. प्रसूतीनंतर अनिताचे वजनही खूप वाढले होते. प्रसूतीच्या वजनामुळे तिला खूप ट्रोल देखील केले गेले, परंतू अनिताने या ट्रोलर्सना वजन कमी करून सडेतोड उत्तर दिले आहे.अनिता हसनंदानीने इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या ट्रान्सफॉर्मेशन व्हिडिओ शेअर केला आहे, तो व्हिडिओ पाहून तिचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.

मुलाला जन्म दिल्यानंतर अनिताचे वजन खूप वाढले होते, परंतु आता तिने आपले वजन खूप कमी केले आहे. व्हिडीओमध्ये अनिता वजन कमी करण्यापूर्वी आणि वजन कमी केल्यानंतरचे आपल्या शरीराचे प्रदर्शन करत आहे. विशेष म्हणजे तिने वजन कमी करण्यासाठी कोणताही कडक डाएट केलेला नाही. सर्व काही खाऊन तिने खूप वजन कमी केले आहे.

तिच्या फिटनेस प्रवासाचे वर्णन करताना, अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘तुम्ही फक्त थांबू नका, चालू ठेवा. अजून बराच पल्ला गाठायचा आहे. डाएट न करता मी सगळं काही खाते.” यासोबतच तिने आईस्क्रीम, पिझ्झा, बर्गर आणि फ्रेंच फ्राईजचे इमोजीही शेअर केले आहेत. तिच्यात झालेले परिवर्तन पाहून चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत कौतुकास्पद प्रतिक्रिया देत आहेत.

श्रद्धा आर्या, अंकिता लोखंडे, माही विज यांसारख्या कलाकारांनी तिच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनिता 9 फेब्रुवारी 2021ला वयाच्या 40 व्या वर्षी आई झाली. त्यानंतर काही महिन्यांनी तिने फिटनेसवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली.

तेव्हा ती म्हणाली होती की, मला घाई नाही आणि मला माझे फिटनेसचे ध्येय हळूहळू साध्य करायचे आहे. म्हणूनच मी झिरो डायटचे अवलंब करून योगाभ्यास सुरू ठेवला आणि बरेच वजन कमी केले.