अनिल कपूरची मुलगी रियाने आपल्या मित्राशी केली ख...

अनिल कपूरची मुलगी रियाने आपल्या मित्राशी केली खुलेआम चुंबाचुंबी (Anil Kapoor’s Daughter Rhea Shares Romantic Liplock Pics With Boyfriend Karan Boolani)

अनिल कपूरची धाकटी मुलगी रिया, एरव्ही प्रसिद्धीपासून दूर असते. पण सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असून, तिथे आपले फोटो नेहमी शेअर करत असते. त्यात आता तिने लई भारी धाडस केलं आहे. आपला बॉयफ्रेंड करण बुलानी याच्याबरोबर काढलेले इंटिमेट फोटो शेअर केले आहेत. ते अत्यंत वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या करण बुलानीसोबत रिया बऱ्याच दिवसांपासून संबंध ठेवून आहे. दोघांनी मिळून वीकएन्ड पार्टी केली. त्यामध्ये ते रोमान्समध्ये आकंठ बुडाले असल्याचे फोटो रियाने काढून घेतले. अन्‌ ते इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यामध्ये रिया आपल्या मित्राच्या बाहुपाशात असून त्याची चुंबने घेताना दिसत आहे.

गेल्या १० वर्षांपासून रिया व करण एकमेकांशी डेट करत असून सदैव एकत्र असतात. लवकरच दोघे विवाहबद्ध होण्याची शक्यता आहे.

रियाने गेल्या शुक्रवारी आपला ३४वा वाढदिवस साजरा केला होता. त्यानिमित्ताने करणने रियाचे फोटो शेअर करत तिला प्रेमाचा संदेश पाठवला होता.

रिया ही अनिल कपूरची धाकटी मुलगी आहे. ती अभिनयक्षेत्रात नाहीये. पण चित्रसृष्टीशी तिचा निर्माती या नात्याने संबंध आहे.

२०१० साली तिनं आपली बहीण सोनम कपूर व अभय देव यांना घेऊन ‘आइशा’ हा चित्रपट तयार केला होता. शिवाय ‘खुबसूरत’ व ‘वीरे दी वेडिंग’ असे दोन चित्रपट तिनं निर्माण केले आहेत. ती फॅशन डिझायनरपण आहे.