इंटीमेट सीन्स करण्यासाठी अंगुरी भाभीने ठेवल्या ...

इंटीमेट सीन्स करण्यासाठी अंगुरी भाभीने ठेवल्या या अटी (Anguri Bhabhi Keeps These Conditions For Doing Intimate Scenes)

अँड टीवी वरील सर्वात प्रसिद्ध मालिका भाभी जी घर पर है  गेली कित्येक वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेती सर्वच पात्रे प्रेक्षकांना आपलीशी वाटतात. पण या मालिकेमध्ये एका पात्राला विशेष पसंती मिळते. ते म्हणजे या मालिकेमधील अंगुरी भाभी.

अंगुरी भाभी ची भूमिका अभिनेत्री शुभांगी अत्रे साकारत आहे. तिच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत.  मालिकेमध्ये अंगुरी भाभी हे पात्र अतिशय निरागस दाखविले आहे. पण खऱ्या आयुष्यात शुभांगी खूप बोल्ड आणि ग्लॅमरस आहे. तिच्या लूकमुळे ती सोशल मिडीयावर चर्चा असते.

भाभी जी घर पर है मालिकेमध्ये अंगुरी भाभी ची भूमिका करणारी शुभांगी कायम आपल्या बोल्ड अंदाजामुळे चर्चेत येत असते. परंतु चाहते सध्या अंगुरी भाभीचे वेगळ्याच एका कारणामुळे कौतुक करत आहे. एका मुलाखतीत शुभांगीला ऑनस्क्रीन इंटीमेट सीन करायला तयार आहे कि नाही असा प्रश्न विचारला होता.

तेव्हा तिने सांगितले कि ती इंटीमेट सीन करण्यास तयार आहे. परंतु त्यासाठी काही मर्यादा आहेत. त्याला योग्यप्रकारे दाखवले गेले पाहिजे. खऱ्या आयुष्यामध्ये शुभांगीला एक मुलगी देखील आहे. तिला या गोष्टीची खूप काळजी आहे. तिच्या मुलीपर्यंत काही चुकीचे पोहोचू नये असे तिला वाटते. ती आपल्या मुलीची खूप काळजी घेते. तिचे फोटोही शेअर करत असते.

अभिनेत्री शुभांगी अत्रे पडद्यावर जेवढी साधी दिसते. तेवढीच खऱ्या आयुष्यामध्ये ती बोल्ड आणि मस्त राहते. अभिनेत्री कायम आपल्या इन्स्टाग्राम पेज सक्रिय असते. तिचा चाहता वर्ग खूप मोठा आहे.