भाभीजी घर पर है मधील अंगूरी भाभीला भयंकर आजारान...

भाभीजी घर पर है मधील अंगूरी भाभीला भयंकर आजाराने ग्रासल्याने निर्मात्यांनी घेतला महत्वाचा निर्णय (Angoori Bhabhi is Suffering From this Disease, Due to Her Illness Makers of ‘Bhabi Ji Ghar Par Hain’ Takes This Decision)

‘भाभीजी घर पर हैं’ या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये अंगूरी भाभीची भूमिका अभिनेत्री शुभांगी अत्रे साकारत आहे. मालिकेतील तिच्या व्यक्तिरेखेला प्रत्येक घराघरात पसंती मिळतेय मात्र शुभांगी सध्या तिच्या आजारपणामुळे खूप अस्वस्थ आहे. त्यामुळे ती शूटिंगही करू शकत नाही, असे सांगण्यात येत आहे. अभिनेत्रीच्या आजारपणामुळे शोच्या निर्मात्यांना मोठा निर्णय घ्यावा लागला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुभांगी अत्रेच्या डोळ्यांत संसर्ग झाला आहे, त्यामुळे ती शूट करू शकत नाही. याच कारणामुळे शोच्या निर्मात्यांना नाईलाजास्तव ट्रॅक बदलावा लागला असून आता ते त्यांचा शो नवीन ट्रॅकसह शूट करणार आहेत.  शुभांगीच्या दोन्ही डोळ्यांना ‘एक्यूट कंजंक्टिवाइटिस’हा आजार असल्याचे निदान झाले आहे. या जिवाणू संसर्गामुळे तिच्या डोळ्यात फोड आले आहेत.

शुभांगीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, निर्मात्यांनी ट्रॅक बदलल्यामुळे ती आता शोसाठी सनग्लासेस घालून शूट करणार आहे. अभिनेत्रीने सांगितले की, मला हा संसर्ग 6 डिसेंबर रोजी झाला होता, त्यामुळे मी रजेवर होती. मात्र, तीन दिवस विश्रांती घेऊनही डोळे नीट होऊ शकले नाहीत. अशा परिस्थितीत शोच्या निर्मात्यांना ट्रॅक बदलणे भाग पडले.

मुलाखतीत अभिनेत्रीने सांगितले की, मी आगामी एपिसोडमध्ये सनग्लासेस घालून शूट करणार आहे. कोणत्याही परिस्थितीत माझ्यामुळे शोचे शूटिंग थांबू नये असे मला वाटते. माझे डोळे अद्याप पूर्णपणे बरे झालेले नाहीत. जंतूसंसर्गामुळे माझ्या डोळ्यात वेदना आणि सूज कायम आहे. उपचार सुरू असूनही मी आवश्यक ती सर्व खबरदारी घेत आहे.

अभिनेत्रीने पुढे सांगितले की, शूटिंगदरम्यान इन्फेक्शनमुळे मी डोळ्यांवर मेकअप करू शकत नाही. माझी  अवस्था पाहता प्रॉडक्शन टीमही मला खूप मदत करत आहे. शुभांगीच्या या आजारामुळे प्रेक्षकांना आगामी भागांमध्ये काही बदल पाहायला मिळणार आहेत. अम्माजी तिला गॉगल घालण्यास सांगतील, त्यानंतर ट्रॅक बदलेल.

शेवटी शुभांगी म्हणाली की, डोळ्यांच्या दुखण्यामुळे मला शूटिंग करताना त्रास होत आहे, मात्र शोचे शूटिंग कोणत्याही परिस्थितीत थांबू नये, असे माझे मत आहे. त्यामुळे मी अत्यंत सावधगिरीने काम करत आहे, परंतु मला पूर्णपणे बरे होण्यासाठी वेळ लागू शकतो.