अनन्या पांडेच्या आईने घरासाठी बनवले नियम सर्वां...

अनन्या पांडेच्या आईने घरासाठी बनवले नियम सर्वांनाच सक्तीने पाळावे लागतात(Ananya Pandey’s Mother Has Made This Strict Rule At Home, Everyone Has To Follow)

अभिनेत्री अनन्या पांडेने फार कमी वेळात इंडस्ट्रीत आपले खास स्थान निर्माण केले आहे. आजच्या काळात तिच्याकडे चित्रपट निर्मात्यांची रांग लागलेली असते. बॉलिवूडमध्ये करीअर करण्यासाठी तिने आपले शिक्षण पणाला लावले. पुढील शिक्षण न घेता अनन्याने करण जोहरच्या चित्रपटातून फिल्मी दुनियेत पदार्पण केले. अनन्या पांडेचे वडील चंकी पांडे हे देखील प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यामुळेच अनन्या पांडेने अतिशय अलिशान जीवनशैली जगली आहे. असे असूनही अनन्याच्या आईने आपल्या घरासाठी व घरातील सदस्यांसाठी काही कडक नियम बनवले आहेत जे पाळणे सर्वांना सक्तीचे आहे. 

एका मुलाखतीदरम्यान अनन्या पांडेची आई भावना पांडे म्हणाली होती की, ती खूप शिस्तप्रिय आई आहे. मुलींना शिस्त शिकवायची असेल किंवा ओरडायचे असेल तर ते काम माझे असते. पती चंकी पांडे मुलींची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. तिने असेही सांगितले होते की, एकदा मी अनन्याचा फोनही जप्त केला होता.

एका मुलाखतीदरम्यान चंकी पांडेने सांगितले होते की, आम्ही कुठेही गेलो तरी प्रत्येकाला ठराविक वेळेवर घरी परतावे लागते. अनन्या आणि त्यांची धाकटी मुलगी रिसा यांनाही भावनाने ठरवलेल्या वेळेतच घरी यावे लागते. मात्र, आता अनन्या काम करायला लागली आहे. तिने स्वत: कमावण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे तिला तिच्या आईकडून घरातल्या नियमात थोडी सूट मिळाली आहे.

एकदा भारती सिंहने एका अवॉर्ड शोमध्ये अनन्या पांडेला विचारले की, तुझी आई तुला कोणते टोमणे मारते तेव्हा अनन्या म्हणाली की, माझी आई टोमणे मारताना फक्त एवढेच म्हणते की “आम्ही तुझ्या वयाचे होतो तेव्हा हे करायचो आणि ते करायचो.”

अनन्या पांडेच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर काही दिवसांपूर्वीच तिचा ‘लायगर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तिच्यासोबत साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडाने काम केले. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फारसा चालला नाही. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समिक्षकांकडून वाईट प्रतिसाद मिळाला होता. 

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम