अनन्या करत होती एकाच वेळी दोन मुलांना डेट, तिच्...

अनन्या करत होती एकाच वेळी दोन मुलांना डेट, तिच्या आईनेच केला धक्कादायक खुलासा (Ananya Pandey Was Dating Two Boys At The Same Time, Mother Made A Shocking Revelation)

करण जोहरचा सुप्रसिद्ध शो कॉफी विथ करण7 मध्ये महीप कपूर, भावना पांडे आणि गौरी खानने हजेरी लावली होती. करण आणि त्यांच्यात छान गप्पा रंगल्या. त्यावेळी करण म्हणाला की अनन्याने एकाचवेळी दोघांना डेट केले होते. हे ऐकून अनन्याच्या आईसोबत तिथे उपस्थित असलेल्यांना सुद्धा धक्का बसला.

 रॅपिड फायर राउंड दरम्यान, जेव्हा करण जोहरने गौरी खानला विचारले की तू सुहानाला डेटिंगसाठी कोणता सल्ला देशील, तेव्हा गौरी खानने“दोन मुलांना कधीही एकत्र डेट करू नकोस.” असा सल्ला देईन असे म्हटले होते.

यानंतर करणने पुन्हा भावना पांडेकडे पाहिलं आणि म्हणाला, “मला वाटतं अनन्याने हे आधीच केलंय”. करण असा बोलल्यावर भावना पांडे म्हणाली, “काय?” यावर करणने उत्तर दिले, “हो, मला वाटते ती एकाच वेळी दोन मुलांसोबत होती”. यावर भावना म्हणाली, “नाही, ती दोघांचाही विचार करायची, म्हणून तिने एकाशी ब्रेकअप केले”.

करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोच्या सातव्या पर्वात अनन्या पांडे विजय देवकरकोंडासोबत आली होती. करणने अनन्याला विचारले, की ‘लायगर’ चित्रपट करत असताना  “तू इशानला डेट करत होती तेव्हाच तू विजयसोबतपण डेटवर गेली होतीस?” करणच्या या प्रश्नावर दोघांनी ही ती फक्त मैत्रीवाली डेट असल्याचे उत्तर दिले. यानंतर करण जोहरने अनन्याच्या वतीने ती इशान खट्टरला डेट करत असल्याचे सांगितले.

शोमध्ये आपल्या नात्याबद्दल बोलताना अनन्या पांडे म्हणाली, मी सिंगल आहे. कोणी विचारत नाही पण मी सिंगल आहे” ज्यावर करणने विचारले, “तुझे ईशानसोबत ब्रेकअप झाले आहे”. अनन्याने करणच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला तेव्हा करण म्हणाला, “तू इशानला डेट करत होतीस, नंतर ब्रेकअप झाला.

चल, तू इशानला डेट करत आहेस हे सगळ्यांना माहीत होतं. पुढे करणने अनन्याला विचारले की ती कार्तिक आर्यनला डेट करत आहे का? यावर अनन्याने उत्तर दिले की, “आम्ही फक्त चांगले मित्र आहोत”. करणने अनन्याला असेही सांगितले की तुला आदित्य रॉय कपूर खूप हॉट वाटतो असे ऐकण्यात आले आहे.