लास व्हेगासमध्ये अनन्या पांडेची घोडेस्वारी : ति...

लास व्हेगासमध्ये अनन्या पांडेची घोडेस्वारी : तिची मौजमस्ती पाहून चाहत्यांचे झाले मनोरंजन (Ananya Pandey Seen Riding A Horse in Las Vegas, Photos Goes Viral on Social Media)

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेता चंकी पांडेची लेक अनन्या पांडेने अतिशय कमी वेळात या झगमगत्या दुनियेत आपली खास ओळख बनवली आहे. तिच्या अभियनासोबतच तिच्या सौंदर्य आणि क्यूटनेसचे चाहते दिवाने आहेत. आपल्या चाहत्यांचे मन जिंकणाऱ्या अनन्याचे सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहेत. म्हणूनच तिची प्रत्येक पोस्ट पाहता क्षणी व्हायरल होते. आताही तिचे अगदी अलिकडचे फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये अनन्या घोडेस्वारी करताना दिसत आहे अन्‌ तिची मौजमस्ती पाहून चाहत्यांचे भरपूर मनोरंजन होत आहे.

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

अनन्या पांडेने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ती वेगवेगळ्या पोशाखांमध्ये घोडेस्वारी करताना दिसत आहे. अभिनेत्रीने तिच्या फोटोंसोबत कॅप्शन लिहिले आहे – ‘yay or neigh’. घोड्यासोबत वेगवेगळ्या स्टाइलमधील अभिनेत्रीचे फोटो पाहून ती घोडेस्वारी खूप एन्जॉय करत असल्याचे स्पष्ट होते. मात्र अनन्याचे हे फोटो पाहिल्यानंतर ती तिच्या आगामी चित्रपटासाठी घोडेस्वारीचे प्रशिक्षण घेत असल्याचा अंदाज अनेक चाहते व्यक्त करत आहेत.

अनन्याचे हे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहेत. लोक लाइक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून अभिनेत्रीच्या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. अर्थात, अनन्याने शेअर केलेले फोटो खूपच सुंदर आहेत. पहिल्या छायाचित्रात अनन्या पिवळ्या रंगाचा टॉप आणि काळ्या पँटमध्ये घोड्यावर बसलेली दिसत आहे. यावेळी तिने डोक्यावर टोपीही घातली आहे.

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

दुसऱ्या फोटोत, अनन्या घोड्यावर बसली आहे आणि बॅकग्राउंडला सूर्यास्ताचे दृश्य दिसत आहे. एका फोटोमध्ये अनन्या घोड्याला प्रेमाने मिठी मारत आहे, तर आणखी एका फोटोत अनन्या पुन्हा घोड्यावर बसलेली दिसत आहे. याशिवाय अनन्याने तिच्या इन्स्टा स्टोरीवर देखील फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये विजय देवराकोंडासोबत ती घोड्यावर स्वार होताना दिसत आहे.

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

असे सांगितले जात आहे की, आजकाल अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा त्यांच्या आगामी ‘लिगर’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी लास व्हेगासला पोहोचले आहेत, जिथे दोघेही घोडेस्वारीचे प्रशिक्षण घेत आहेत आणि अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांसोबत तेथील छायाचित्रे शेअर केली आहेत. या चित्रपटात अनन्यासोबत साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडा दिसणार आहे. याशिवाय अनन्या सिद्धांत चतुर्वेदीसोबत ‘खो गये हम कहाँ’ मध्येही दिसणार आहे.