आगामी लाइगर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबई लोकल...

आगामी लाइगर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबई लोकलमध्ये प्रवास केल्याबद्दल अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडाला यूजर्सनी केले ट्रोल.. (Ananya Pandey Got Trolled For Traveling In Mumbai Local With Vijay Deverakonda, Users Says- ‘There Is An Empty Train, Still Struggling…)

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या तिच्या आगामी ‘लाइगर’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चित्रपटाचे मुख्य कलाकार अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा मुंबईच्या लोकलमधून प्रवास करताना दिसले. त्यांचा मुंबई लोकलमध्ये प्रवास करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्स अनन्या पांडेला चांगलेच ट्रोल करत आहेत. सध्या बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आणि साऊथस्टार विजय देवरकोंडा आगामी चित्रपट लाइगरमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहेत. येत्या 25 ऑगस्टला हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनन्या व विजय रिअॅलिटी शोमध्ये उपस्थिती लावत आहेत. तसेच मुंबईच्या लोकलमध्ये जाऊनही प्रमोशन करत आहेत.

काही दिवसांपूर्वीच अनन्या आणि विजय मुंबईतील वांद्रे येथील लहान मुलांसोबत डान्स करताना दिसले. तेव्हा त्यांच्यासोबत चित्रपटाचे कोरिओग्राफर आणि त्यांचे अंगरक्षकही होते. त्यानंतर त्यांनी मुंबईच्या  रेल्वेमधून प्रवासही केला. त्यांचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. पण नेटकऱ्यांनी अनन्या पांडेवर निशाणा साधत तिला ट्रोल केले.

या ट्रोलिंग मागचे कारण म्हणजे, ज्या ट्रेनच्या डब्ब्यातून ते प्रवास करत होते तो डब्बा पूर्णपणे रिकामी होता. अनन्या आणि विजय दोघेही रिकामी डब्यात उभे होते. त्यामुळे यूजर्सनी त्यांनी कमेंटमधून खूप ट्रोल केले.

एका यूजरने कमेंटमध्ये ट्रोल करत लिहिले की, लोकल ट्रेल पूर्ण खाली आहे, बिचाऱ्यांना किती संघर्ष करावा लागला. तर आणखी एका यूजरने लिहिले की, २० बॉडीगार्ड सोबत घेऊन प्रवास करतात. दुसरा एक यूजर म्हणतो, दोघांनी मुंबई- विरार लोकलमध्ये शूट केले पाहिजे म्हणजे समजेल. काहींनी तर अनन्या पांडेच्या लूकवर ही कमेंट केली आहे. एकाने कमेंटमध्ये म्हटले की स्ट्रगल, रिकामी लोकलमध्ये प्रवास करण्याचा खरा स्ट्रगल. तर आणखी एकाने लिहिले की, कोणी तरी तिला सांगा ती ट्रेन रिकामी आहे.