‘आता बिकीनी पण पार्टीवेअर झाली की काय?...

‘आता बिकीनी पण पार्टीवेअर झाली की काय?’ अनन्या पांडेचा अजब पारदर्शक ड्रेस बघून लोकांची प्रतिक्रिया (Ananya Pandey Gets Brutally Trolled For Black See Through Dress)

धर्मा प्रॉडक्शनचे सीईओ अपूर्व मेहता यांच्या वाढदिवसाच्या पार्टीला बरेच सितारे पोहचले. पण सगळ्यांच्या नजरा खिळल्या होत्या अनन्या पांडेवर कारण तिने गहजब करणारा ड्रेस घातला होता. तिचा हा लूक इतका व्हायरल झाला की, निंदकांनी तिची चांगलीच हजेरी घेतली. या पार्टीत अनन्याने झिरझिरीत, पारदर्शक काळा गाऊन घातला होता. मलायका अरोराने फरहान अख्तरच्या पार्टीत असाच एक ड्रेस घातला होता, त्याच्या जवळपास पोहोचणारा अनन्याचा हा ड्रेस होता.

अनन्याचा हा ड्रेस मोनोकीनी सारखा होता. त्यावर संपूर्ण पारदर्शक गाऊन सारखे लेयर होते. तो इतका पारदर्शक होता की तिचे अंगप्रत्यंग दिसत होते. काही लोकांना तो आवडला तर काहींना ते फॅशन डिझास्टर वाटले.

कोणी त्यास मच्छरदाणी म्हटले तर कोणी मॉडर्न स्वीम सूट म्हटले. पार्टीत असा ड्रेस कोणी घालतं का? – अशा लोकांच्या प्रतिक्रिया आहेत. या पार्टीत इशान खट्टर आला होता. इशान आणि अनन्या यांच्यातील रिलेशनशिपच्या चर्चा रंगात आहेत.

Photo Courtesy: Instagram/viralbhayani