प्रेमभंग झाल्यानंतर अनन्या पांडे खाते ही खास गो...

प्रेमभंग झाल्यानंतर अनन्या पांडे खाते ही खास गोष्ट, अन् एका दिवसात भरून निघतात घाव… (Ananya Pandey Eats This The Most When Hearts Breaks, Which Heals The Wounds Of A Broken Heart In A Day)

अभिनेता चंकी पांडे यांची २३ वर्षांची लेक अनन्या पांडे तिच्या चित्रपटांमुळे जितकी प्रसिद्धीस आली नाही तेवढी तिच्या प्रेमप्रकरणांमुळे जास्त चर्चिली गेली आहे. अनन्याने कधीही तिच्या नातेसंबंधांवर शिक्कामोर्तब केले नाही, परंतु तिने अलीकडेच स्वीकारले आहे की तिचा प्रेमभंग झाला आहे. अन्‌ एक खास गोष्ट खाऊन ती स्वतःच्या जखमेवर उपचार करते. अनन्या पांडेला ब्रेकअपच्या वेदनेतून आराम देणारी ही खास गोष्ट कोणती आहे ते जाणून घेऊया.

‘खाली पीली’ चित्रपटातील अनन्याचा को-स्टार ईशान खट्टरसोबतच्या तिच्या नात्याची खूप चर्चा झाली होती. ईशान आणि अनन्या अनेक कार्यक्रम, आऊटिंग आणि व्हेकेशनवर एकत्र पाहिले गेले आहेत. अर्थात, दोघांपैकी कोणीही हे नाते कधीच स्वीकारले नाही किंवा नाकारलेही नाही. परंतु दोघंही त्यांच्यातील नात्याबाबत गंभीर असल्याचे सगळ्यांनाच ठाऊक होते. मात्र, काही काळापूर्वी दोघांनी परस्पर संमतीने ३ वर्षांचे त्यांचे नाते संपवले.

यामागचं कारण अद्याप समोर आलेले नाही. पण अलीकडेच अनन्याने एका मुलाखतीत सांगितले की, सर्वसामान्यांप्रमाणेच तिलाही प्रेमभंग झाल्यानंतरचे दुःख काय असते ते अनुभवण्यास मिळाले. ‘प्रेमभंग झाल्यास अरिजित सिंगची सर्व गाणी ऐका आणि हवं तितकं आईस्क्रीम खा,’ असा सल्ला ती देते. याने हृदयावरील घाव लवकर भरून निघतील. तसेच तुमचे मन दुखावले असेल तेव्हा सर्वोत्तम मित्रांसोबत वेळ घालवण्याइतकी भन्नाट कल्पना नाही, असेही तिने सुचविले आहे.

ईशान आणि अनन्याने त्यांच्या नात्यावर कधीच उघडपणे काहीही सांगितले नव्हते, पण ईशानची आई नीलिमा अजीम यांनी दोघांमधील केमिस्ट्रीवर जे काही भाष्य केले होते, त्यावरून त्या दोघांमधील नाते नक्कीच मैत्रीच्या पुढे गेले असल्याचे समजते. नीलिमाने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘ती (अनन्या) आमच्या कौटुंबिक वर्तुळाचाच एक भाग आहे. साहजिकच ती ईशानच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. मी म्हणेन की ते चांगले मित्र आणि चांगले सहकारी आहेत. ती त्यांच्या मित्रांमध्येही व्यवस्थित समरस होते.’

ईशानच्या आधी बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनसोबतही अनन्याचे नाव खूप चर्चिले गेले. दोघांनी ‘पति, पत्नी और वो’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यानंतर त्यांच्यात काहीतरी शिजत असल्याची बातमी समोर आली होती, पण हे नाते फारच कमी टिकले आणि अनन्याने स्वतःला या नात्यापासून वेगळे केले.

सध्या अनन्या पुन्हा एकदा प्रेमात पडल्याची चर्चा सुरू आहे. आता ती आदित्य रॉय कपूरसोबत सिक्रेट डेटिंग करत असल्याचं बोललं जात आहे. हे दोघे आतापर्यंत कोणत्याही प्रोजेक्टमध्ये किंवा सार्वजनिकरित्याही एकत्र दिसले नसले, तरीही मिळालेल्या माहितीनुसार दोघांमध्ये नक्कीच कुछ कुछ हो रहा है.

(सर्व फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)