पारदर्शक कपडे घातल्याने ट्रोलर्सनी अनन्या पांडे...

पारदर्शक कपडे घातल्याने ट्रोलर्सनी अनन्या पांडेवर केली आगपाखड , पण चंकी पांडेनी आपल्या मुलीची बाजू घेतली (Ananya Pandey Became The Target Of Trollers On Wearing Transparent Dress, But Father Chunky Pandey Justifies It)

‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये करिअरची सुरुवात करणाऱ्या अनन्या पांडेच्या फॅशनची चर्चा अनेकदा होत असते. काही वेऴेस ती फॅशनसाठी ट्रोल सुद्धा होते. आता पुन्हा एकदा ती तिच्या फॅशनमुळे ट्रोल झाली आहे.

अनन्याने एका कार्यक्रमासाठी पारदर्शक कपडे घातले होते. त्यामुळे नेटकऱ्यांनी तिला खूप ट्रोल केले. काहींनी तर अनन्याचे वडील चंकी पांडे यांना देखील कमेंटमध्ये मुलीला चांगले कपडे घायालया शिकवा असे म्हटले आहे. यावर आता चंकी पांडे यांनी देखील त्यांचे मत व्यक्त केले आहे.

अलिकडेच झालेल्या एका कार्यक्रमात अनन्याने ब्रालेट टॉप आणि ब्लॅक शीर गाऊन परिधान केला होता. त्यासाठी तिला खूप ट्रोल केले गेले. लेकीला ट्रोल केलेले पाहून चंकी पांडे यांनी अनन्याची बाजू घेत म्हटले की,

‘अनन्याला त्या पोषाखात कोणत्याच समस्या वाटत नाही तर इतरांना का वाटाव्यात. आई वडील म्हणून मी आणि माझ्या पत्नीने कधीच आमच्या दोन्ही मुलींना कधी काय घालावे आणि काय घालू नये हे सांगितले नाही. आम्ही आमच्या मुलींचे पालनपोषण खूप चांगले केले आहे. त्या खूप समजूतदार आहेत. अनन्या आज इंडस्ट्रीमध्ये काम करते त्यामुळे तिला तिच्या कामासाठी ग्लॅमरस दिसणे आवश्यक आहे. तिला जर पुढे जायचे असेल तर चांगले तयार व्हायलाच हवे.’

त्यांनी पुढे सांगितले की, “माझ्या मुलींबद्दल मला एक गोष्ट नक्की माहीत आहे ती म्हणजे त्यांच्यामध्ये एक प्रकारचा निरागसपणा आहे. त्या कोणतेही कपडे उगीच काहीही दिसतील असे घालणार नाहीत. “आपण जे काही परिधान करतो त्यावर हास्यास्पद प्रतिक्रिया येणे खूप सामान्य गोष्ट आहे. या गोष्टी आपण प्रशंसा म्हणून घेतल्या पाहिजेत.

आणि जर तिच्या वडिलांची ती काय घालते यावर हरकत नसेल, तर मला वाटत नाही की इतर कोणीही हरकत घ्यावी.” अनन्या आता स्वतःवर हसायला शिकली आहे असेही चंकी यांनी सांगितले.