‘लाइगर’ पडला, पण त्याचे सोयरसुतक नसलेली अनन्या ...

‘लाइगर’ पडला, पण त्याचे सोयरसुतक नसलेली अनन्या पांडे निघाली इटलीच्या सहलीला : त्यावर ट्रोलर्सनी घेतला तिचा खरपूस समाचार (Ananya Panday Gets Mercilessly Trolled For Holidaying In Italy After Liger’s Super Flop Show)

अनन्या पांडे (ananya panday) आणि विजय देवरकोंडा (Vijay devarkonda) यांचा लाइगर (liger) चित्रपट चांगलाच आदळला असला तरी त्याचे सोयरसुतक नसलेली अनन्या मात्र इटलीमध्ये मौज करताना दिसली. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर सहलीचे फोटो शेअर केले आहेत ज्यात ती कधी बिकिनीत उन्हात बसलेली दिसतेय तर कधी आइस्क्रीम खाताना दिसत आहे.

अनन्याने इटली येथील केपरी शहरातील वेगवेगळ्या लोकेशनवरील अनेक फोटो शेअर केले आहेत. तिने तिचे बिकिनीमधील हॉट फोटोही शेअर केले आहेत, जे प्रचंड व्हायरल होत आहेत. अनन्याला मौज मजा करताना पाहून काही लोक मात्र तिला ट्रोल करत आहेत.

चित्रपट पडल्यानंतरही ती एवढी शांत कशी राहू शकते, अशा प्रकारची ट्रोलर्स प्रतिक्रिया देत आहेत. तसेच पहिल्यांदाच चित्रपटाचे अपयश साजरं करताना आम्ही पाहत आहोत, असेही काही जण म्हणत आहेत. काही नेटकऱ्यांनी तर असंही म्हटलंय की, निर्मात्यांचे पैसे डुबवून स्वतः मात्र मौज करत आहे. तर दुसऱ्याने म्हटलंय, एका साऊथ अभिनेत्याचे करिअर खराब करून स्वतः मात्र भटकंती करत आहे.

लाइगर ही करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनची निर्मिती आहे आणि पुरी जगन्नाथने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. चित्रपटाच्या अपयशानंतर जगन्नाथ मुंबई सोडून हैद्राबादला शिफ्ट झाला असल्याचे म्हटले जात आहे. एवढेच नाही तर त्याने विजय देवरकोंडा सोबतचा त्याचा आगामी चित्रपट ‘जन गण मन’ देखील काही वेळाकरीता थांबवला आहे.

लाइगर इतक्या वाईट पद्धतीने अपयशी ठरेल याचा कोणालाही अंदाज नव्हता. अनन्या खरं तर फोटोंमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे, ज्यासाठी चाहते तिचे कौतुकही करत आहेत. परंतु ती नेटकऱ्यांच्या नजरेतूनही सुटली नसल्याने काही लोक तिला अभिनय शिकून घेण्याचा सल्ला देत आहेत.