बहिणीच्या मेहंदीच्या कार्यक्रमात धुम्रपान करतान...

बहिणीच्या मेहंदीच्या कार्यक्रमात धुम्रपान करताना दिसली अनन्या पांडे, व्हायरल फोटो पाहून भडकले नेटकरी (Ananya Panday Caught Smoking At Cousin Alanna Panday’s Mehendi Ceremony)

अनन्या पांडेचा एक फोटो सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. या फोटोत अनन्या पांडे धुम्रपान करताना दिसत आहे. हा फोटो अनन्या पांडेची चुलत बहीण अलाना पांडेच्या मेहेंदी सोहळ्यातला आहे.

काल  अभिनेत्री अनन्या पांडे आपल्या कुटुंबासह चुलत बहीण अलाना पांडेच्या मेहंदी समारंभात सहभागी झाली होती. त्याचवेळी ती स्मोकिंग करताना दिसली. लग्नात सहभागी होण्यासाठी आलेल्या मित्राने हे फोटो क्लिक केले होते. नंतर हा फोटो सोशल मीडियावर टाकण्यात आला.

तो फोटो आता हटवण्यात आला असला तरी तो हटवण्यापूर्वी वापरकर्त्याने स्क्रीन शॉट घेतला होता आणि तो शेअर केला होता. अभिनेत्रीचा स्मोकिंगचा फोटो पाहून सोशल मीडिया युजर्स तिला चांगलेच ट्रोल करत आहेत.

हा फोटो पोस्ट करत युजरने लिहिले – अनन्या पांडे स्मोकिंग करेल अशी अपेक्षा नव्हती.

या फोटोत अनन्या एका कोपऱ्यात उभी आहे आणि लग्नाला आलेल्या पाहुण्यांसोबत उभं राहून स्मोकिंग करत आहे. हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट होताच, त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

हे फोटो पाहून अभिनेत्रीचे चाहते आश्चर्यचकित झाले असून अनन्या धुम्रपान करू शकते अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

अनन्या पांडे आपल्या पालकांसोबत मेहेंदी सोहळ्याला जाताना दिसली. या सोहळ्यात अतुल अग्निहोत्री, अलविरा अग्निहोत्री, चंकी पांडे – भावना पांडे, बॉबी देओल आणि त्यांची पत्नी आलिया कश्यप देखील उपस्थित होते.

सोहेल खानच्या घरी मेहंदी सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला, ज्यामध्ये हेलन आणि सलमा खानही उपस्थित होत्या.