राधिका मर्चंटच्या हातावर लागली अनंत अंबानी यांच...

राधिका मर्चंटच्या हातावर लागली अनंत अंबानी यांच्या नावाची मेहंदी; व्हिडिओ व्हायरल (Anant Ambani And Radhika Merchant Mehendi Function Bride Dance On Ghar More Pardesia)

देशाचे सर्वात प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. आता त्यांच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. अनंत आणि राधिका यांच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. राधिका यांच्या हातावर अनंत अंबानी यांच्या नावाची मेंहदी लागली आहे.

मेहंदी सोहळ्यातील राधिकाचा लूक देखील चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. राधिका मर्चंटने मेहेंदीसाठी खास गुलाबी रंगाचा फ्लोरल एम्ब्रॉएडर्ड लेहंगा परिधान केला होता. शिवाय राधिका यांनी घातलेल्या दागिन्यांची चर्चा देखील तुफान रंगत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

राधिका एक उत्तम नृत्यांगणा असून तिने भरतनाट्यमचं शिक्षण घेतलेलं आहे. मेहेंदी सोहळ्यातही राधिकाने तिच्या नृत्याने चार चांद लावले. एका फॅन पेजवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

नीता मुकेश अंबानी या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये राधिका ‘घर मोहे परदेसिया’ या बॉलिवूड गाण्यावर थिरकताना दिसत आहे. अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या मेहेंदी सोहळ्यातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

गेल्याच महिन्यात अनंत व राधिका यांचा साखरपुडा पार पडला. राधिका ही एनकोर हेल्थकेअरचे सीईओ बिरेन मर्चंट व शैला मर्चंट यांची मुलगी आहे. राधिकाने परदेशातून पॉलिटिकल आणि इकोनॉमिक्स या विषयांमध्ये शिक्षण घेतल्यानंतर फॅमिली बिझनेस सांभाळत आहे. राधिका एनकोर हेल्थकेयरच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये सामिल आहे. राधिकाच्या नेट वर्थबद्दल सांगायचं झालं तर राधिका यांच्याकडे जवळपास १० कोटी रुपयांची संपत्ती आहे.

राधिकाच्या वडिलांकडे जवळपास ७५५ कोटी रुपयांची संपत्ती आहे. राधिकाचे वडील विरेन मर्चंट देखील भारतातील प्रसिद्ध उद्योजक आहेत. अंबानी कुटुंबाची सून झाल्यानंतर राधिकाच्या संपत्तीत आणखी वाढ होईल. वडिलांच्या संपत्तीची राधिका एकटी वारसदार आहे.

अनंत अंबानी व राधिका गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. आता विवाहबंधनात अडकून ते नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहेत.

(फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)