म्युझिशियन बनण्यासाठी ‘या’ अभिनेत्य...

म्युझिशियन बनण्यासाठी ‘या’ अभिनेत्याने सोडले होते शिक्षण.. आज घेतो एका चित्रपटासाठी करोडो रुपये..(An Actor Left School To Become A Musician : Now Demands Crores For A Film)

परिस्थिती कशीही असो तिला धैर्याने तोंड दिले की कधीना कधी चित्र पालटतेच. फक्त ठरवलेले काम पूर्ण करण्याची इच्छा शक्ती असावी लागते. दमदार अभिनय आणि स्टाइलमुळे अभिनेता जॉनी डेपने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. ‘पायरेट्स ऑफ कैरेबियन’ मधल्या ‘जॅक स्पॅरो’ या पात्राने जॉनीला खऱी ओळख मिळवून दिली. गेले काही दिवस जॉनी त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे खूप चर्चेत होता. जॉनीची पूर्वाश्रमीची पत्नी अम्बर हर्डने त्याच्यावर मानहानीचे आरोप केले होते. या केसचा निकाल पुराव्यांअभावी जॉनीच्या बाजूने लागला.

जॉनी डेप हा एक अभिनेता, निर्माता आणि म्युझिशियन आहे. त्याचा जन्म ९ जून १९६३ ला अमेरिकेत झाला. जॉनी १५ वर्षांचा असताना त्याचे आईवडील वेगळे झाले. त्याच्या आईने नंतर रॉबर्ट पामरसोबत लग्न केले. विशेष म्हणजे रॉबर्ट पामर जॉनीसाठी इन्स्पिरेशन होता.

जॉनी १२ वर्षांचा असताना त्याच्या आईने गिटार गिफ्ट दिली होती. तेव्हापासून तो वेगवेगळ्चा म्युझिक बॅण्डमध्ये गिटार वाजवायचा. रॉक म्युझिशियन बनण्यासाठी जॉनीने दहावीत अर्धवट शिक्षण सोडले. काही वर्षांनी जेव्हा तो पुन्हा शाळेत गेला तेव्हा त्याला त्याच्या प्रिंसिपलने त्याच्या स्वप्नांचा पाठलाग करण्याचा सल्ला दिला. 1980 मध्ये त्याने बॅण़्ड द किडस् चालू केले ज्याचे पुढे नामांतर सिक्स गन मेथड असे करण्यात आले.

वयाच्या 20 व्या वर्षी लॉस एंजिलेसला गेल्यावर त्याची ओळख अभिनेता निकोलस केजसोबत झाली. त्यानेच जॉनीला अभिनय करण्याचा सल्ला दिला व त्यासाठी मदतही केली. जॉनीने अ नाईटमेयर ऑन एल्म स्ट्रीट या चित्रपटासाठी ऑडिशन दिली. तिथे तो सिलेक्टही झाला. या चित्रपटापासून जॉनी डेपची अभिनयातील कारकिर्द सुरु झाली. पुढे त्याने वेगवेगळ्या धाटणीचे अनेक चित्रपट केले.

पण 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या वॉल्ट डिज्नी पिक्चर्सचा पायरेट्स ऑफ द कैरेबियन: द कर्स ऑफ द ब्लॅक पर्ल या चित्रपटाने जॉनीला वेगळीच ओळख मिळवून दिली. या चित्रपटात जॉनीने समुद्री डाकूची भूमिका साकारली होती. या एका भूमिकेमुळे त्याला जगभर ओळख मिळाली. पुढे या चित्रपटाचे आणखी 2 पार्ट प्रदर्शित झाले. ते देखील प्रेक्षकांना खूप आवडले. 2006 ला जॉनीने ‘चार्ली अॅण्ड द चॉकलेट’ फॅक्टरी या चित्रपटात विल्ली वोंका ही भूमिका साकारली होती. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट तुफान गाजला होता.