अमृता खानविलकरने छोट्या चंद्राला दिल्या आभाळभर ...

अमृता खानविलकरने छोट्या चंद्राला दिल्या आभाळभर शुभेच्छा (Amruta Khanvilkar Praised A Lot To 8 year Old Child Artist For Her Excellent Lavni Performance)

मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा या स्टार प्रवाहवर नुकत्याच सुरु झालेल्या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय. या मंचावरील छोट्या दोस्तांनी आपल्या जबरदस्त परफॉर्मन्सनी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. नुकतंच या मंचावर चिमुकल्या श्रीमयी सुर्यवंशीने चंद्रा सिनेमातल्या बाई गं या गाण्यावर परफॉर्म केलं. ८ वर्षांच्या श्रीमयीचा हा परफॉर्मन्स पाहून सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकरही तिच्या नृत्याच्या प्रेमात पडली आहे. सोशल मीडियावर श्रीमयीच्या गाण्याची झलक शेअर करत तिने श्रीमयीला शुभेच्छा दिल्या आहेत.

श्रीमयीला शुभेच्छा देताना अमृता म्हणाली, ‘चंद्रमुखी सिनेमातील दोन अविस्मरणीय गाणी चंद्रा आणि बाई गं खूप लोकप्रिय झाली. अनेक फॅन्स, अनेक छोट्या मुली या गाण्यावर नृत्य करताना दिसल्या आणि अजूनही दिसतात. मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा कार्यक्रमामध्ये ८ वर्षांच्या श्रीमयीने माझ्या अत्यंत प्रिय गाण्यावर हा मंत्रमुग्ध करणारा परफॉर्मन्स केला. खरं सांगू तर अशा चिमुकल्यांना जेव्हा लावणी अशा प्रकारे सादर करताना बघते तेव्हा प्रचंड आनंद होतो. या गोड चंद्राला आभाळभर शुभेच्छा…खूप मोठी हो’ अशा शब्दात अमृताने श्रीमयीचं कौतुक केलं. आहे.’