अमृता खानविलकर आणि पारस कलनावत यांना ‘झलक...

अमृता खानविलकर आणि पारस कलनावत यांना ‘झलक दिखला जा’ मधून बाहेर काढले: परीक्षकांच्या निर्णयावर चाहते झाले नाराज (Amruta Khanvilkar And Paras Kalnawat Eliminated From The Show, Fans Are Not Happy With The Decision)

नृत्यावर आधारित रिअॅलिटी शो ‘झलक दिखला जा-10’मधून या आठवड्यात दोघेजण बाहेर गेले. एकाचवेळी दोघांना बाहेर काढल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. या आठवड्यात या शोमधून अमृता खानविलकर आणि पारस कलनावत यांना काढून टाकण्यात आले. जजिंग पॅनेलमध्ये असलेल्या करण जोहरने त्या डबल एविक्शनबद्दल सांगून सर्वांना आश्चर्यचकित केले.

रिअॅलिटी शो ‘झलक दिखला जा 10’ हा अंतिम फेरीच्या जवळ येत आहे. शोमध्ये रोज नवे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. रिअॅलिटी शोच्या शेवटच्या एपिसोडमध्ये डबल एव्हिकशन पाहायला मिळाले. यावेळी शोमधून एक नव्हे तर दोन स्पर्धा बाहेर पडले. अमृता खानविलकर आणि पारस कलनावट अशी या दोन सेलिब्रिटींची नावे आहेत.

शोमध्ये अमृता खानविलकरला फायनलिस्ट म्हणून पाहिले जात होते. पारस कलनावटही शोमधून बाहेर पडला आहे. अमृता आणि पारस या दोघांनाही शोमध्ये कमी मते मिळाल्याचे बोलले जाते. कमी मते मिळाल्याने शोच्या परीक्षकांनी हा निर्णय घेतला. शोचे परीक्षक करण जोहर यांनी डबल एव्हिक्शनच्या चर्चेवरून पडदा उचलला.

परीक्षक म्हणून करण जोहरने रुबिना दिलैक, गुंजन, नीती, अमृता आणि पारस यांना आपापल्या कोरियोग्राफरसोबत स्टेजवर बोलावले. मग करण म्हणाला – गेल्या आठवड्यात हरलेली टीम या आठवड्यात सुरक्षित नाही. या आठवड्यात एक नाही तर दोन स्पर्धक बाहेर पडतील.

करण जोहरच्या तोंडून आपलं नाव ऐकताच अमृता आणि पारस दोघेही भावूक झाले. अमृता म्हणाली – मला कल्पनाही नव्हती की आज मला शोमधून बाहेर जावे लागेल. शोमध्ये इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास माझ्यासाठी खूप खास होता. माधुरी मॅडमकडून आशीर्वाद म्हणून 101 रुपये मिळणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान क्षण आहे.

परीक्षकांच्या या निर्णयावर चाहते नाराज आहेत. त्यांचा हा निर्णय चाहत्यांना पटलेला नाही. ट्विटरवर चाहते नाराजी व्यक्त करत आहेत. एका चाहत्याने ट्विटरवर “#अमृताखानविलकर अंतिम फेरीत जाण्यास पात्र होती #झलकदिखला जा10” असे लिहिले.