अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगवर फोटो शेअर करत आपण बर...

अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगवर फोटो शेअर करत आपण बरे असल्याची दिली माहिती… (Amitabh Bachchan’s health Ok ; Big B gave information about his Health through Pictures on the Blog)

फोटो सौजन्य : अमिताभ ब्लॉग

दोन दिवसांपूर्वी बॉलीवुडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी, त्यांची तब्येत बरी नसून, ते एक सर्जरी करण्यासाठी रग्णालयात जात असल्याचे ब्लॉगमध्ये लिहिले होते. बिग बींच्या मोजक्या शब्दातील या ब्लॉगमुळे सर्व चाहते अतिशय चिंताग्रस्त झाले होते. परंतु आजच्या वर्तमानानुसार बिग बींची तब्येत आता ठीक आहे आणि ते आपल्या घरी आराम करत आहेत. त्यांना काय झाले होते आणि सर्जरीचं कारण काय होतं हे अजूनही नीट कळलेलं नाही, परंतु अमिताभजींनी आपल्या डोळ्यांचे ऑपरेशन केलं असल्याचं म्हटलं जात आहे. अमिताभजींनी स्वतः आपल्या ब्लॉगवर स्वतःचे फोटो शेअर करून आपण बरे असल्याची माहिती दिली आहे, तसेच आपल्यासाठी प्रार्थना करणाऱ्या चाहत्यांचे त्यांनी आभारही मानले आहेत. बिग बींनी जे फोटो पाठवले आहेत त्यावरून त्यांच्या डोळ्यांचे ऑपरेशन झाले असल्याचेच दिसते. त्यांच्या डोळ्यांच्या बाजूला पट्ट्या लावलेल्या आहेत आणि डोळ्यांखाली काही लाइन्स आहेत. अजूनही त्यांच्या तब्येतीबाबत विस्तृतपणे माहिती उपलब्ध झालेली नाही.

फोटो सौजन्य:अमिताभ ब्लॉग

फोटो सौजन्य:अमिताभ ब्लॉग

फोटो सौजन्य:अमिताभ ब्लॉग

फोटो सौजन्य:अमिताभ ब्लॉग

आपल्या ब्लॉगवर अमिताभ बच्चन यांनी जे फोटो शेअर केले आहेत त्यात ते आपल्या डोळ्यांवर जोर देत असल्याचे दिसते. यावरून त्यांच्या डोळ्यांना त्रास होत होता असे कळते. अमिताभजींनी मोतीबिंदूचे ऑपरेशन करून घेतले आहे, असं म्हटलं जात आहे. त्यांचे ऑपरेशन व्यवस्थित झाले असून, काळजी करण्यासारखे काही नाही आहे. म्हणूनच अमिताभजींनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंट तसेच सोशल ब्लॉगवर देखील आपण बरे असल्याचे कळविले आहे.

फोटो सौजन्य:अमिताभ ब्लॉग

फोटो सौजन्य:अमिताभ ब्लॉग

फोटो सौजन्य:अमिताभ ब्लॉग

आपल्या ब्लॉगमध्ये त्यांनी आपल्या तब्येतीसाठी प्रार्थना करणाऱ्या आपल्या शुभचिंतकांचे आभार मानले आहेत. त्यांच्या ब्लॉगवर २८ फेब्रुवारी आणि आजची १ मार्च अशी तारीख लिहिलेली आहे.
दोन दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी इन्स्टाग्रामवर आपल्या ब्लॉगमधून आपण आजारी असल्याचे सांगून सगळ्यांनाच काळजीत टाकले होते. परंतु आज त्यांनी आपण बरे असल्याची बातमी दिल्यामुळे सर्व चाहत्यांना हायसे वाटले आहे.