अमिताभ बच्चन यांची प्रकृती अस्थिर (Amitabh Bach...

अमिताभ बच्चन यांची प्रकृती अस्थिर (Amitabh Bachchan’s health deteriorates again; There is talk of surgery in the blog)

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची तब्येत पुन्हा एकदा बिघडली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र त्यांना नक्की काय झालं आहे? त्यांना कोणत्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे? याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. त्यामुळे बिग बीच्या प्रकृतीविषयी त्यांच्या चाहत्यांना चिंता वाटत आहे. बिग बींचे केवळ चित्रपटसृष्टीतीलच नव्हे तर लहान-थोर अशा सगळ्यांच्याच मनात जे आदराचे, जिव्हाळ्याचे स्थान आहे, ते वेगळेपणाने सांगण्याची गरज नाही.

आपल्यावर प्रेम करणाऱ्या या लाखो चाहत्यांसाठीच तब्येत बरी नसतानाही खुद्द अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे. शनिवारी रात्री त्यांनी त्यांच्या ब्लॉगद्वारे चाहत्यांना ही माहिती दिली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर बिग बींचे चाहते त्यांच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करत आहे.

‘मेडिकल कंडीशन, सर्जरी, आता लिहू शकत नाही…’ इतक्या मोजक्या शब्दात त्यांनी आपल्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. बिग बीचं हे छोटंसं वाक्य चाहत्यांच्या मनातील चिंता वाढवत आहे. त्यामुळे आता चाहते बिग बींच्या पुढील मेसेजच्या प्रतिक्षेत आहेत.

तब्येतीच्याच कारणामुळे अमिताभ बच्चन यांनी केबीसी शो सोडला होता. परंतु बिग बी आपल्याला ‘चेहरे’, ‘झुंड़’ आणि ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या माध्यमातून भेटीस येणार आहेत.